शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

लहान पापलेटची मासेमारी; बोटींवर कारवाई, गस्ती नौकेद्वारे पिल्ले, जाळ्यांचे मोजमाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:35 IST

Palghar: समुद्रात लहान पापलेटच्या पिल्लांची सुरू असलेली बेसुमार मासेमारी रोखण्यासाठी सहआयुक्त तथा अंमलबजावणी कक्षाचे अध्यक्ष महेश देवरे यांना स्वतः टीमसह मंगळवारी समुद्रात उतरावे लागले. त्यांनी उत्तन, वसई कार्यक्षेत्रात गस्ती नौकेद्वारे मच्छिमारी बोटींची तपासणी केली.

- हितेन नाईक पालघर - समुद्रात लहान पापलेटच्या पिल्लांची सुरू असलेली बेसुमार मासेमारी रोखण्यासाठी सहआयुक्त तथा अंमलबजावणी कक्षाचे अध्यक्ष महेश देवरे यांना स्वतः टीमसह मंगळवारी समुद्रात उतरावे लागले. त्यांनी उत्तन, वसई कार्यक्षेत्रात गस्ती नौकेद्वारे मच्छिमारी बोटींची तपासणी केली. यावेळी लहान पापलेटची मासेमारी करणाऱ्या दोन बोटमालकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ (सुधारित २०२१)अंतर्गत कारवाई करून प्रतिवेदन दाखल केले.  यावेळी बोटीतील पापलेटची पिल्ले, जाळ्यांचा आस यांचे मोजमाप केले. 

खुलासा सादर करण्याचे दिले आदेश लहान पापलेटच्या पिल्लांची बेसुमार मासेमारी केली जात आहे. मत्स्यव्यवसाय विभागाकडून ‘ज्युव्हेनाईल ॲक्ट’ची अंमलबजावणी केली जात नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसारित झाल्यानंतर त्याची दखल मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी घेतली. 

कोकणातील सर्व जिल्ह्यांतील सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी अल्पवयीन मासेमारी व खरेदीबाबत अंमलबजावणी करून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. स्वतंत्र अंमलबजावणी कक्षाचे अध्यक्ष महेश देवरे, प्रादेशिक उपायुक्त दिनेश पाटील यांनी बुधवारी  अल्पवयीन लहान पिल्लांची मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई केली. 

दिवसेंदिवस मत्स्य उत्पादनात घसरण केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था सीएम एफआरआय यांनी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या ५८ मत्स्य प्रजातींच्या किमान कायदेशीर आकारमानाची शिफारस करून पारंपरिक मच्छिमारांच्या हिताचे संरक्षण, विनियमन आणि अल्पवयीन मासे पकडणे टाळण्याबाबत व्यवस्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही काही मच्छीमार लहान आसाची जाळी वापरून अल्पवयीन मासे पकडत आहेत. त्यामुळे मत्स्य उत्पादनाचा आकडा घसरू लागल्याने बंदरांतील बोटींची संख्या अर्ध्यावर आली आहे. अनेक सहकारी संस्था कर्जबाजारी होऊन बंद पडल्या. हे रोखण्यासाठी जुव्हेनाईल ॲक्टची कारवाई गरजेची आहे. 

समुद्रात १० नॉटिकल क्षेत्रामध्ये अंमलबजावणी कक्षाकडून कारवाई करताना वसई येथील दोन बोटींवर प्रतिवेदन दाखल केले आहेत. - दिनेश पाटील, सहायक मत्स्य व्यवसाय अधिकारी पालघर.

टॅग्स :fishermanमच्छीमारpalgharपालघर