शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
3
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
4
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
5
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
6
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
7
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
8
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
9
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
10
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
11
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
12
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
13
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
14
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
15
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
16
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
17
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
18
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
19
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
20
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला

वसईत सहा नवी पोलीस ठाणी

By admin | Updated: January 20, 2016 01:48 IST

लोकसंख्येसोबतच गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहून यापूर्वी वसई-विरार परिसरात चार पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे असतानाच आणखी सहा नवी पोलीस ठाणी

शशी करपे,  वसईलोकसंख्येसोबतच गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहून यापूर्वी वसई-विरार परिसरात चार पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे असतानाच आणखी सहा नवी पोलीस ठाणी आणि दोन उपअधिक्षक कार्यालये निर्माण करावीत असा नवा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर आणखी दोन उपअधिक्षक कार्यालये स्थापन करण्याचा प्रस्तावही राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर वसईत एकूण १३ पोलीस ठाण्यांसह तीन उपअधिक्षक कार्यालये तयार होतील. तर रेल्वे पोलिसांनाही विरार, नालासोपारा आणि भार्इंदर अशी तीन नवी पोलीस ठाणी हवी आहेत. सध्या वसईत तालुक्यात वसई, माणिकपूर, नालासोपारा, विरार, तुळींज, वालीव आणि अर्नाळा सागरी पोलीस मिळून एकूण सात पोलीस ठाणी आहेत. तसेच एक उपअधिक्षक आणि एक अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय आहे. या सर्वांचे मिळून वसईत अवघे ६३४ पोलीस बख आहे. वसई तालुक्याची लोकसंख्या १८ लाखाहून अधिक झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे तालुक्यात गुन्हेगारी आलेख वाढत आहे. गेल्या वर्षभरात तालुक्यात ४४ खून, ४४५ घरफोड्या, १३३ सोनसाखळी चोरींच्या घटनेसह बलात्कार, मारामारी याह अनेक गुन्ह्णांची संख्या मोठी आहे. अपुरे पोलीस बळ आणि साधनसामुग्रीमुळे गुन्हेगारी रोखण्यास पोलीस अपयशी ठरताना दिसत आहेत. विरार पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी ८७५ गन्हयांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारशेच्या घरात गुन्हयांची नोंद झाली आहे. एका पोलीस ठाण्यात वर्षभरात जास्तीत जास्त तीनशे गुन्ह्णांची नोंद झाली पाहिजे असा पोलीस कार्यपद्धतीचा संकेत आहे. यापेक्षा जास्त गुन्हे नोंदवले गेले तर तपास करणे अवघड होऊन बसते आणि गुन्ह्णांची उकल होत नसल्याने तक्रारदारांना न्याय मिळत नाही. त्यासाठी पोलीस विभागाने याआधी मांडवी, आचोळे आणि पेल्हार ही नवी तीन पोलीस ठाणी तयार करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. राज्य सरकारने या प्रस्तावाला तत्वत: मान्यता देऊन पोलीस महासंचालकांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. आता पोलिसांनी विरार पश्चिम, कणेर आणि नायगाव पूर्व अशा आणखी तीन नव्या पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव पाठवला आहे. नव्या प्रस्तावामुळे जास्त गुन्हेगारी असलेल्या विरारसह तुळींज आणि वालीव पोलीस ठाण्यांचे विभाजन होणार आहे. वसई तालुक्यासाठी सध्या एकच पोलीस उपअधिक्षक आहेत. पोलीस ठाण्यांच्या वाढीसोबत त्याचे विभाजन करून नालासोपारा आणि विरार या दोन ठिकाणी पोलीस उपअधिक्षक कार्यालये तयार करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. हे प्रस्ताव संमत झाल्यास वसई तालुक्यात एकूण १३ पोलीस ठाणी आणि तीन उपअधिक्षक कार्यालये निर्माण होतील. दरम्यान, मीरा रोड, भाईदर, नायगाव, वसई, नालासोपारा, विरार आणि वैतरणा रेल्वे स्टेशनसाठी मिळून वसईत एकच पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्याचे संख्याबळ अवघे १५० आहे. गेल्या वर्षभरात यापरिसरात रेल्वे अपघातात २६४ जणांचे प्राण गेले आणि २५४ जण जखमी झाले. तर वर्षभरात २१३ गुन्हे नोंदले गेले. या सातही स्टेशनमधून दररोज किमान दहा लाख प्रवाशी प्रवास करतात. पण, पोलीस बळ कमी असल्याने रेल्वे पोलीस प्रवाशांना सेवा देण्यात अपुरे पडताना दिसत आहे. त्यासाठी वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे विभाजन करून विरार, नालासोपारा आणि भार्इंदर अशी तीन पोलीस ठाणी तयार करावीत असा प्रस्ताव पाठवला आहे.