शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

सहा. आयुक्तांना हवी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 03:09 IST

तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही आस्थापना आणि मालमत्ता कर आकारणी विभागाचे प्रमुख असलेल्या सहाय्यक आयुक्त सुर्वे यांना पुन्हा मुदतवाढ हवी आहे.

शशी करपे ।लोकमत न्यूज नेटवर्कवसई : तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही आस्थापना आणि मालमत्ता कर आकारणी विभागाचे प्रमुख असलेल्या सहाय्यक आयुक्त सुर्वे यांना पुन्हा मुदतवाढ हवी आहे.आयुक्तांच्या खास मर्जीत असल्याने त्यांना मुदतवाढ मिळावी यासाठी महापालिका पुन्हा एकदा राज्य सरकारला विनंती करणार असल्याची माहिती हाती आली आहे. मात्र सुर्वे यांच्या अखत्यातरीत असलेल्या आस्थापना आणि कर विभागात अनागोंदी कारभार सुरु असल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजीचा सूर आहे.सहाय्यक आयुक्त सदानंद सुर्वे आॅगस्ट २०१४ ला वसई विरार महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आले आहेत. आयुक्त सतीश लोखंडे यांच्या खास मर्जीतल्या सुर्वे यांच्याकडे आस्थापना आणि मालमत्ता कर आकारणी या महत्वाच्या विभागाची जबाबदारी आहे. आस्थापना विभागाने अनेक वरिष्ठांना डावलून पात्रता नसलेल्यांना पदोन्नती देऊन वरिष्ठ लिपीक बनवले आहे. काही वरिष्ठ लिपिकांना पात्रता नसतानाही प्रभारी सहाय्यक आयुक्तपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानंतर आपल्या मर्जीतील वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक आयुक्तांना मलाईदार पदांवर नेमण्यात आले आहे.त्यात सुर्वे यांचा हस्तक्षेप मोठा असल्याचा आरोप महापालिकेतील डावलले गेलेले कर्मचारी करीत आहेत. कालबद्ध पदोन्नती, अंतर्गत बदल्या, वार्षिक वेतनवाढ, बदल्या, कर्मचाºयांच्या सेवापुस्तिकेत महत्वाच्या नोंदी याकरीता आस्थापना विभागाकडून आर्थिक फायद्यासाठी कर्मचाºयांची अडवणूक केली जात असल्याचाही कर्मचाºयांचा आरोप आहे.दुसरीकडे नऊ प्रभागातील मालमत्ता कर आकारणीतही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे या विभागातील दोन लिपीकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्यानंतर उजेडात आले आहे. असे असतांनाही नालासोपाºयातील निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाºयाकडे दोन प्रभागातील कर विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. या कर्मचाºयाला कर विभागातच गैरव्यवहार केल्याप्रकरणी २००३ साली निलंबित करण्यात आले होते. त्यालाच वरिष्ठ लिपिकाचा दर्जा देऊन दोन प्रभागाचे प्रमुख करण्यामागे सुर्वे यांच्याच हात असल्याचाही आरोप केला जातो.ते सध्या आयुक्त सतीश लोखंडे यांच्या खास मर्जीतील असल्याने त्यांच्या खात्यातील अनागोंदी कारभाराकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. ते सध्या महापालिकेत चांगलेच स्थिरावले असल्याने प्रतिनियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतरही त्यांना महापालिकेतच राहण्यातरस असल्याचे दिसून येत आहे.एप्रिल महिन्यात राज्य सरकारनेत्यांच्या बदलीचा आदेश काढला होता.सुर्वे यांची बदली थांबविण्यासाठी आयुक्त प्रयत्नशीलत्यावेळी आयुक्तांनी बदली थांबवण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली होती. आता ७ आॅगस्टला राज्य सरकारने पुन्हा सुर्वे यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. यावेळी त्यांची बदली उद्योग, उर्जा व कामगार विभागात करण्यात आली आहे. मात्र, ती थांबावी यासाठी सुर्वे यांनी पुन्हा फिल्डींग लावली आहे. प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाºयांची कमतरता असल्याचे कारण पुढे करून आयुक्त हे त्यांची बदली थांबवण्याची शिफारस करतील अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.