शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
3
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
4
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
5
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
6
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
7
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
8
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
9
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
10
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
11
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
12
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
13
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
14
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
15
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
16
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
17
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
18
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
19
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
Daily Top 2Weekly Top 5

वीजवाहिनी पडून सहा म्हशी मृत्युमुखी

By admin | Updated: July 5, 2017 06:00 IST

पालघर रस्त्यालगत मनोर येथे वीज वाहिनी पडून एका शेतकऱ्याच्या सहा म्हशी जागीच ठार झाल्या. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे

लोकमत न्यूज नेटवर्कमनोर : पालघर रस्त्यालगत मनोर येथे वीज वाहिनी पडून एका शेतकऱ्याच्या सहा म्हशी जागीच ठार झाल्या. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली. दुग्धव्यावसायिक असलेल्या या शेतकऱ्याच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.घरत पाडा येथील सुनील घरत यांच्या म्हशी पराजित नगरच्या जवळ शेतामध्ये चरत असतांना जास्त दाबाची मुख्य वीज वाहीनी त्यांच्या अंगावर पडली. तिला त्या चिकटल्या व जागीच त्यांचा मृत्यू ओढावला. त्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबियांवर शेतीच्या ऐन हंगामात संकट ओढवले आहे. त्याच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह दुधाच्या धंद्यावर चालत होता आज सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली त्यानंतर महावितरणचा एकही अधिकारी फिरकला देखील नाही महावितरणाच्या गलथान कारभारामुळे ही गंभीर घटना घडली अशा अनेक घटना पालघर जिल्हयात घडतात मात्र त्याबाबत कारवाई शून्य होते. मनोर पालघर रस्त्याच्या बाजूला दोन इंग्लिश मिडीयम शाळा व भर वस्ती आहे. तिथे जर ही वाहिनी कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. शेतीला जोड देण्यासाठी दुग्ध व्यवसाय करणाऱ्या सुनील घरत यांच्या एका एका म्हशीची किंमत ९०,००० ते ९५,०००० पर्यंत होती मनोर पोलीस ठाण्यात शेतकरी घरत यांनी तक्र ार दाखल केली आहे अधिक तपास मनोर पोलीस करीत आहे.त्यांना शासनाने व महावितरणने तातडीने अर्थसहाय्य करावे, अशी मागणी होत आहे. विजेची तार पडून शेतकऱ्याबरोबर बैलाचा दुर्दैवी मृत्यूवाडा : तालुक्यातील सापने खु. ह्या गावातील झिपरु धनगर (५४) हा शेतकरी नांगरणी करीत असतांना सकाळी ११ च्या सुमारास विजेची तार नांगराला जुंपलेल्या बैलाच्या अंगावर पडल्याने त्याचा व झिपरु धनगर या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. पालघर जिल्ह्यात सध्या चांगल्या प्रकारे पाऊस पडत असल्याने भात लागवाडीची कामे मोठ्या प्रमाणात चालू झाली आहेत. त्यामुळे शेतात भरपूर मनुष्यबळ असते. या घटने नंतर लगेचच गावकऱ्यांनी महावितरणशी संपर्क साधून वीज पुरवठा खंडीत केला.पुरवठा खंडित झाल्यावर या बैलाला आणि मयत झिपरु धनगर यांना बाहेर काढण्यात आले. घराच्या बाजूलाच नांगरणी सुरू असल्याने झिपरु धनगर यांची सून सुद्धा शेतातच होती. विजेची तार पडल्याने झिपरु धनगर खाली कोसळले. त्या वेळेस त्याची सून बांधावर होती. तिला वाटले की थकव्याने किंवा चक्कर आल्याने ते खाली कोसळले असावेत. त्यामुळे ती त्यांना उचलायला धावत गेली. मात्र अगदी जवळ गेल्यावर तिच्या लक्षात विजेची तार तुटल्याचे आल्याने ती जागीच थांबली म्हणून नशिबाने वाचली.