शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सिंगे, रोशन आणि गोयल यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 03:21 IST

पालघरचे पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे, वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, व पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निमित्त गोयल यांची बदली करण्यात आली आहे.

पालघर : पालघरचे पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे, वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, व पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निमित्त गोयल यांची बदली करण्यात आली आहे. सिंगे यांची बदली मुंबईच्या पोलीस उपायुक्त पदी करण्यात आली आहे. तर, रोशन यांची बदली नागपूर शहरच्या उपायुक्त पदावर तर गोयल यांची अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग येथे बदली झाली आहे.मंजुनाथ सिंगे यांच्या जागी राजभवनातील राज्यपालांचे परिसहायक गौरव सिंग यांची वर्णी लागली आहे. तर वसईचे अपर पोलीस अधीक्षक यांच्या जागी अकोल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पोलीस प्रशासन सेवेतील अधिकारी मंजुनाथ सिंगे यांना गडचिरोलीहून पालघरचा पदभार देण्यात आला होता. एप्रिल २०१७ ला त्यांनी आपल्या अधीक्षक पदाचा पदभार सांभाळला होता. मात्र, १५ महिने उलटत नाही तोवर त्यांची बदली करण्यात आली. पालघरच्या दोन पत्रकारावर गुन्हे दाखल करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी एकजुटीचे दर्शन घडवीत पालघर मध्ये आंदोलने केली होती. नागपूरच्या अधिवेशनात या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. सभापती रामराजे निंबाळकर यांनी सिंगे, पोनि.किरण कबाडी, पोउनी.तौफिक सय्यद याच्या विरोधात कारवाईचे आदेश गृहविभागाला दिले होते.वसईमध्ये नव्याने रु जू होणारे अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी यापूर्वी बोईसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिले असून पालघर मध्ये दिवसाढवळ्या एका तरु णाचा झालेल्या खून प्रकरणाचा त्यांनी अवघ्या ५ दिवसात छडा लावीत आरोपीना अटक करण्यात यश मिळविले होते.डी.जी.ची भेट घेणारपत्रकार मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षक किरण कबाडी आणि उपनिरीक्षक तौफिक सय्यद यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश सभापती रामराजे निंबाळकर यांनी देऊनही कारवाई होत नसल्याने शिवसेनेच्या आमदार डॉ. निलम गोºहे महासंचालकांची (डी.जी.) भेट घेणार आहेत.या प्रकरणातील पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांची बदली करण्यात यावी तसेच पोलीस निरीक्षक किरण कबाडी आणि उपनिरीक्षक तौफिक सय्यद यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोºहे यांनी दि.१६ जुलै २०१८ रोजी औचित्याच्या मुद्द्याद्वारे नागपूर पावसाळी अधिवेशनात केली होती.शुक्रवारी सरकारने काढलेल्या शासन निर्णयानुसार सिंगे यांची बदली करण्यात आली आहे. याबाबत आ. डॉ. गोºहे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याकडे पोलीस निरीक्षक कबाडी आणि उपनिरीक्षक सय्यद यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसVasai Virarवसई विरार