शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूतील श्रीजी इमारत अखेर झाली रिकामी, लोकमतच्या वृत्ताची गंभीर दखल : पोलीस व नगरपालिका प्रशासनाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:28 IST

या शहरातील सर्वात जुनी व भर बाजारपेठेत असलेल्या अतिधोकादायक श्रीजी अपार्टमेंटच्या तळ मजल्यामधील सहा दुकाने ‘लोकमत’मध्ये बातमी आल्यानंतर डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, पोलीस निरिक्षक सुदाम शिंदे, तसेच डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी

शौकत शेखडहाणू : या शहरातील सर्वात जुनी व भर बाजारपेठेत असलेल्या अतिधोकादायक श्रीजी अपार्टमेंटच्या तळ मजल्यामधील सहा दुकाने ‘लोकमत’मध्ये बातमी आल्यानंतर डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, पोलीस निरिक्षक सुदाम शिंदे, तसेच डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांच्या प्रयत्नाने दोन दिवसांत रिकामी करण्यात आल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.डहाणूच्या सागरनाका येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या या इमारतीत ४८ पेक्षा जास्त निवासी सदनिका व अनेक गाळे तळमजल्यावर बांधण्यात आले होते. मात्र बांधकाम निकृष्ट असल्यामुळे ही इमारत जास्त काळ सुरक्षित राहिली नाही. परिणामी इमारतीचा बहुसंख्य भाग खचला व इमारतीमध्ये अनेक छोटी छोटी झाडे वाढून इमारतीच्या बाहेरील दर्शनी भागात पूर्णत: भग्न झाला होता. मोठया प्रमाणात पडझड झाल्याने ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे रेल्वे स्टेशन, डहणूगाव, चारोटीकडे जाणाºया रस्त्यांवरून जाणाºया येणाºयांच्या जिवितास धोका निर्माण झाल्याने डहाणू नगर परिषदेकडे ती पाडून टाकण्याची मागणी सतत केली जात होती. परंतु पालिका प्रशासन केवळ पावसाळयांत नोटीसा पाठवून हात वर करीत होती. कालांतराने श्रीजी इमारतीमधील सर्व सदनिकाधारकांना फ्लॅट खाली केले परंतु, तळमजल्यावरील सहा दुकानदारांनी आपले दुकान सुरूच ठेवल्याने दररोज खरेदीसाठी मोठया प्रमाणात तिथे गर्दी होत होती.श्रीजी इमारत कोसळल्यास मोठया प्रमाणात जीवीत हानी होणार असे वृत्त लोकमतेने प्रसिध्द केल्याने पोलीस व नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले. डहणू पोलीस व नगर परिषद प्रशासनाने महावितरणला वीज कनेक्शन काढून टाकण्याचे आदेश दिल्यानंतर गाळेधारकांनी धावपळ केली व दोन दिवसांत सहा दुकाने खाली करवून घेण्यात प्रशासनाला यश आले. लवकरच ही इमारत पाडण्यात येणार आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टळणार असून लोकमतने याबाबतीत आवाज उठविल्याबद्दल ने येथील नागरिक व मच्छिमार कार्यकर्ते हरेश मर्दे यांनी लोकमतचे आभार मानले.