विक्रमगड : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी आळवणी करीत गणेशभक्तांनी सात दिवसाच्या गणपतीबाप्पांना व गौरीनाही निरोप दिला़ मात्र, दिड व पाच दिवसांच्या विसर्जनास पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे गणेभक्तांची मोठी हिरमोड झाली. तारांबळ उडाल्याने अनेकांनी पावसांत भिजत मिरवणुकी काढल्या तर अनेकांनी शहरी स्टाईलने गाडीमध्ये गणपती बाप्पांची मुर्ती घेवून थेट मिरणुकीविनाच विसर्जनाचे ठिकाण गाठले़ त्यामुळे रात्री उशिरापर्यत विसर्जन सुरु होते़ मात्र सात दिवसांच्या विसर्जनास पावसाचे आज दिवसभर सक्तींची विश्रांती घेतल्याने मिरवणुकीच्या आनंद द्विगुणीत झाला होता़तालुक्यातील विविध विसर्जन घाटांवर (नदी, ओव्हळ) सार्वजनिक आणि घरगुती अशा शेकडो गणेशमूर्तींचे तर त्यासोबत गौरींचे विसर्जन करण्यात आले़ यंदा मात्र दिडदिवसांच्या गणेशमूर्तीपेक्षा ७ दिवसांच्या गणेशमूर्तींची संख्या जास्त दिसत होती़सात दिवसांपासुन आलेल्या गणरायाला व तिन दिवसांपासून पाहुंचार घेणाºया माहरवाशीनी गौरींना निरोप देतांना भक्त भावूक झाले होते़ त्यातच पावसाने पुर्णपणे उघडीप दिल्याने बाप्पाच्या भक्तांचा उत्साह पाहण्या सारखा होता़. सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान गणेशाची विधिवत पूजा-आरती करुन श्रीचे विसर्जन करण्यात आले़ विसर्जनाआधी हातगाडी, टेम्पो, रिक्षा, कार, ट्र्क व रथामध्ये गणेशमुर्ती ठेवून वाजगाजत गुलाल उधळत त्यांची मिरवणूक काढण्यांत आली होती.शहरातील अ़ ब़ वार्डातील, दगडीचाळ, मुख्यबाजारपेठ, जरीमरी नगर, फॉरेस्ट कार्यालय आदी ठिकाणाच्या गणेशमुर्तींचे गडदे येथील तांबानदीवर विसर्जन करण्यांत आले़ विक्रमगड स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक रंजीत पवार यांनी आपल्या पोलिस पथकासह सर्वत्र फिरुन विसर्जनस्थळांची पाहाणी केली़
पावसाच्या विश्रांतीने मिरवणुकीत जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:43 IST