शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

ईद-ए-मिलादनिमित्त सर्वत्र जल्लोष; शेकडो अरबी परीक्षार्थींना प्रोत्साहनपर पारितोषिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 02:12 IST

मुस्लिम धमार्चे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर (स.ऐ.व.) यांच्या जयंती निमीत्त जव्हार शहरातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी आपल्या बाळ-गोपांळांना नविन कपडे, कुर्ता-पायजामा घालुन पारंपारीक पोशाखात भव्य मिरवणूक काढून ईद-ए-मिलादुन नबी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

- हुसेन मेमनजव्हार : मुस्लिम धमार्चे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर (स.ऐ.व.) यांच्या जयंती निमीत्त जव्हार शहरातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी आपल्या बाळ-गोपांळांना नविन कपडे, कुर्ता-पायजामा घालुन पारंपारीक पोशाखात भव्य मिरवणूक काढून ईद-ए-मिलादुन नबी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जामा मस्जिदीच्या आवारात, एस. टी. स्टॅण्ड येथून रिझवी मोहल्ला येथे यंदा सर्व मिरवणूकतील बाळ गोपाळांना शिरणी (गोड पदार्थ) वाटण्यात आले.जव्हार शहरात ईद-ए-मिलादुन नबी बाळ-गोपाळांसह तरूण साजरा करतात. ईदे मिलाद साजरा करण्याकरीता महिन्या भरा पासुन तरूण वगार्ची तयारी सुरू असते. दर्गाह आळी चौक, रिझवी चौक, एस. टी. स्टॅन्ड या ठिकाणी व आप आपल्या मोहल्ल्यामध्ये पताके, चमकदार लडी, पुर्ण मोह लाईटींगने सजवून, झेंडे, घराघरात बिल्डींगवर भव्य रोषनाई करण्यात आलेली आहे.या दिवशी जुलूस (मिरवणूक) जामा मस्जिदी पासून पाचबत्ती नाका, एस.टी. स्ॅटण्ड वरून रझवी मोहल्ला, गांधीचौकातून जामा मस्जिदी पर्यत काढण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने अबाल वृद्धांनी मिरवणूकीमध्ये सहभाग घेतला. यावेळी वेगवेगळ्या समित्यांकडून शरबत, समोसे, बिस्कीट, चॉकलेट, शरबत, नानखटाई, बुंदी, लहान मुला-मुलींकरीता आईस्क्रिम तसेच जव्हार मेमन जमाती मार्फत वडापावचे वाटप करण्यात आले. दर्गाह आळी येथे मिरवणुकीचे समापन झाले. तेथे लहान मुला-मुलींचे अरबी मधून परीक्षा घेऊन तब्बल ५५० लहानग्याना विविध प्रकारचे प्रोत्साहनपर परितोषिकांचे वाटप करण्यात आले.यावेळी सुन्नी जामा मस्जिदचे ट्रस्ट बोडार्चे पदाधिकारी सै. खलील कोतवाल, नासीर शेख, रहीम लुलानिया, तंजीम पिरजादा, रियाज मनियार, अर्शद कोतवाल, सै. शकिल कुनमाळी, नदिम चाबुकस्वार, नासीर मेमन, माजी अध्यक्ष सैय्यद जैनुलआबेदीन पिरजादा, जब्बार मेमन, बबला शेख, जावेद पठाण, तसेच मेमन जमातचे अध्यक्ष हाजी हुसेन मेमन, उपाध्यक्ष जुनेद मेमन व शब्बीर मेमन, सेक्रटरी अवेश मिन्नी, हाजी ईमतियाज, हाजी जुनेद, हाजी ईमरान, मुस्ताक बल्लू, आसीफ मेमन तसेच मदरसा अनवारे रजाचे हाजी सरफराज मेमन, वसीम शेख, मौलाना हैदर अली, असगर अली आदींनी परीक्षार्र्थींच्या निकालाचे नियोजन केले. यात बाळ-गोपाळांसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. बक्षीस वितरणानंतर रिझवी मोहल्ल्यातील तरूणांनी लंगरचे नियोजने केले होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार