शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

औषधांचा तुटवडा, रुग्णांचा रुग्णालयांत मुक्काम वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 22:54 IST

बाहेरच्यांना बेड मिळेना : कोरोना रुग्ण बरे होण्यास लागतोय वेळ

पंकज राऊत बोईसर : कोरोना  विषाणूची प्राथमिक लक्षणे दिसून येत नाहीत. सुरुवातीचे काही दिवस घरच्या घरी घेतलेला थातूरमातूर उपचार  व औषधोपचाराला यश  न  आल्यानंतर कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांत खाट मिळविण्यासाठी  प्रचंड धावपळ व  परिश्रम करावे लागत आहेत. यानंतर मोजक्याच रुग्णांना जेमतेम खाट  मिळतात, परंतु  तेथे आधीच ऑक्सिजनबरोबरच अत्यावश्यक असलेल्या अनेक  औषधांच्या तुटवड्यामुळे दाखल झालेले रुग्ण बरे होण्यास विलंब होऊन त्यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढत असल्याचे दिसून आले आहे.

अत्यंत आवश्यक असलेल्या शेकडो  रुग्णांना वेळेवर खाटा उपलब्ध होत नसल्याने त्यांचाही आजार धोक्याची पातळी गाठून ते गंभीर होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. नागरिकांच्या निष्काळजी व  बेजबाबदारपणाबरोबरच दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला संबंधित यंत्रणेला आलेली काहीशी मरगळ व गाफील राहिलेली यंत्रणा,  काही गोष्टींच्या नियोजनात झालेली दिरंगाई आणि समन्वयाच्या  अभावामुळे  पालघर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भाग  कोरोनाच्या विळख्यात सापडला असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत आहे.

उपचार करणाऱ्या कोविड रुग्णालयांची तुटपुंजी संख्या, साधे बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, औषधे, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा, आदी सर्व महत्त्वाच्या सोयी-सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने एकूणच सर्व यंत्रणेवर प्रचंड ताण येऊन सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने कोरोना रुग्णांचा बरे होण्याच्या  कालावधीत वाढ होत आहे. रोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होत नसल्याने परिस्थिती गंभीर होत आहे. 

वसई महापालिका क्षेत्रात प्रतिदिन सुमारे ८०० ते  हजार रुग्ण आढळत आहेत. त्यानंतर पालघर नगरपरिषद क्षेत्र व बोईसरबरोबरच तालुक्यातील इतर गावांमध्येही कोरोना आज मोठ्या प्रमाणात हात पसरवत आहे. मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावापासून दूर असलेले जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड या ग्रामीण तालुक्यांतील  पाडेच्या पाडे  आज कोरोनाच्या  भयंकर विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :boisar-acबोईसरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस