शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! एकाच कुटुंबातील तिघांची रेल्वेखाली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 06:36 IST

suicide : विरार पूर्वेकडील साईनाथनगरमध्ये पोपट धोंडीराम जंगम हे पत्नी नंदा, मुलगा सोमनाथ, मुलगी प्रमिला व नात समीक्षासह राहत होते.

नालासोपारा : विरारच्या साईनाथनगरमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांनी शनिवारी पहाटे नालासोपारा ते वसईच्या दरम्यान रेल्वेखाली आत्महत्या केली. नंदा जंगम (५५), सोमनाथ (३१), प्रमिला (३५) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत, तर या वेळी १० वर्षांची समीक्षा गंभीर जखमी झाली आहे.विरार पूर्वेकडील साईनाथनगरमध्ये पोपट धोंडीराम जंगम हे पत्नी नंदा, मुलगा सोमनाथ, मुलगी प्रमिला व नात समीक्षासह राहत होते. जंगम यांचे मसाला कुटण्याचे (डंक) दुकान असून, त्याच्यावरच उदरनिर्वाह व्हायचा. शनिवारी पहाटे पोपट यांना कुटुंबातील चौघांनी फिरायला जातो, असे सांगून ते घरातून बाहेर निघाले होते.रेल्वे पोलिसांनी सात वाजण्याच्या सुमारास पोपट यांना फोन करून त्यांची पत्नी नंदा, मुलगा सोमनाथ व मुलगी प्रमिला यांचे मृतदेह रेल्वे रुळावर सापडल्याचे सांगितले. त्यांची १० वर्षांची  नात समीक्षा ही बेशुद्ध अवस्थेत सापडल्याने पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले.रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, जंगम कुटुंबातील सदस्याचा शुक्रवारी वाढदिवस साजरा करण्यात आला होता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून धंदा होत नसल्याने गरिबीमुळे त्रासल्याने त्यांनी जीवनाचा अंत केल्याची चर्चा सुरू आहे. मालगाडीच्या मोटरमनने जंगम परिवारातील सदस्य रेल्वे रुळावर झोपले होते, असे सांगितले. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारSuicideआत्महत्या