शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:06 IST

मीरा रोड आणि भार्इंदर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर बसलेल्या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी शिवसेनेने सोमवारी भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या हद्दीत केलेले आंदोलन विनापरवानगी होते

भार्इंदर : मीरा रोड आणि भार्इंदर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर बसलेल्या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी शिवसेनेने सोमवारी भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या हद्दीत केलेले आंदोलन विनापरवानगी होते, अशा दावा करत रेल्वे सुरक्षा बलाने त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. या बेकायदा आंदोलनाच्या आधारे शिवसेनेला अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा त्या पक्षाचा दावा आहे.एल्फि न्स्टन रोडच्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर तशी घटना मीरा रोड व भार्इंदर रेल्वे स्थानकातील पुलावर होऊ नये, हा रेल्वे परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी शिवसेनेने आ. प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी फेरीवाल्यांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी केल्याचे सांगण्यात आले. परंतु रेल्वे स्थानक व पादचारी पुलावर फेरीवाले बसतच नसल्याचा दावा रेल्वे सुरक्षा बलाकडून करण्यात आला. उत्तर दिशेकडील पुलाच्या बाजुला फेरीवाले बसत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार पालिकेचा असल्याचा दावा संबंधित अधिकाºयांनी केला. फेरीवाले नसतानाही काही बोगस फेरीवाल्यांना तेथे आंदोलनापूर्वी बसविण्यात आल्याचा दावा रेल्वेच्या सुत्रांनी केला. त्यांनाच फेरीवाले भासवुन रेल्वेच्या हद्दीत विनापरवानगी आंदोलन छेडल्याचा दावाही सुरक्षा बलाने केला.शिवसेनेने भार्इंदर स्थानकातील पादचारी पुलावर घोषणाबाजी सुरु करुन आंदोलन छेडले. ते बेकायदा असून रोखण्याचा प्रयत्न करणाºया सुरक्षा बलाच्या अधिकाºयालाही धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला.हा प्रकार काही वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आल्याने सुरक्षा बलाने त्याचा सविस्तर अहवाल सोमवारीच वरिष्ठांकडे पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेने मात्र या आंदोलनाची पूर्वकल्पना रेल्वे पोलिसांना दिल्याचा दावा केला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारShiv Senaशिवसेना