शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

शिवसेनेकडून महापालिकेवर आरोप : सत्यशोधन समितीचे ‘विसर्जन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 02:36 IST

वसई-विरार महानगरपालिकेच्या सत्यशोधन समिती बनावट असल्याची ओरड शिवसेना करीत असताना रविवारी या सत्यशोधन समितीचे व अनिधकृत पुलाचे प्रतिकात्मक विसर्जन राजावली खाडीमध्ये शिवसैनिकांनी केले.

नालासोपारा - वसई-विरार महानगरपालिकेच्या सत्यशोधन समिती बनावट असल्याची ओरड शिवसेना करीत असताना रविवारी या सत्यशोधन समितीचे व अनिधकृत पुलाचे प्रतिकात्मक विसर्जन राजावली खाडीमध्ये शिवसैनिकांनी केले.या समितीच्या माध्यमातून वसईत ज्या ९ जनासुनावण्या झाल्या त्या सभेला जनतेने सपशेल पाठ फिरवली होती. अशा बनावट सत्यशोधन समितीचे त्याच राजावली खाडीमध्ये रविवारी शिवसेना नवघर माणिकपूर शहर शाखेतर्फे विसर्जन करण्यात आले. या पूरासाठी कारणीभूत ठरलेल्या तात्पुरत्या लोखंडी पुलाची प्रतिकृतीही प्रवाहात सोडण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, विधानसभा संघटक विनायक निकम, गटनेत्या किरण चेंदवणकर, शहरप्रमुख राजाराम बाबर, उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण, सुधाकर रेडकर , सुभाष विश्वासराव, शैला हाटकर, प्रतिभा ठाकूर, शशिभूषण शर्मा, संजय गुरव हे उपस्थित होते.महसूल व वनविभागाने बेकायदा बांधकामाकडे केलेले दुर्लक्ष पूरासाठी जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. वसईतील पुर ओसरल्यानंतर महापौर रूपेश जाधव यांनी अनिधकृत बांधकामे फक्त महापालिका क्षेत्रातच झालेली नसून महसूल व वनविभागाच्याही जागेत झाल्याचे जाहिररित्या वक्तव्य केले होते. वसई औद्योगिक क्षेत्राचे १५० कोटीहून अधिक नुकसान झाल्याचेही त्यांनी त्यावेळी सांगीतले होते. दरम्यान, राजीवली खाडीमध्ये लोखंडी पुलासाठी टाकलेला माती भराव व सिमेंट पूरास कारणीभूत ठरला होता.तहसीलदार, आयुक्त कुणाला झाकताय? राजावली येथील खाडीवर उभारण्यात आलेल्या पूलामुळे खाडीचे पात्र निमूळते होऊन पाणी वाहून जाण्यास जागाच उरली नव्हती. राजावली खाडीमध्ये भराव टाकून जो अनिधकृत पूल बांधला त्यामुळेच वसईमध्ये जुलै मिहन्यात पूर आला.हा पूल कोणी बांधला ? याबाबत तहसीलदार व पालिका आयुक्त यांनी अजुनही मौन बाळगले आहे. त्यामुळे हे अधिकारी नेमके कोणाला वाचवू पाहत आहे ? असा सवाल शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी केला आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारShiv Senaशिवसेना