शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवनेरी ढाबा ते कासटवाडी रस्ता धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 02:25 IST

रस्त्याच्या दोन्ही बाजूने वळणावर दुतर्फा झाडे, झुडपे वाढली आहेत.

जव्हार : जव्हारहुन वाडा व मनोर हायवे पालघर कडे जातांना शिवनेरी धाबा ते कासटवाडीपर्यंत फक्त ३ कि.मी.अंतर वाहन चालकांना जीव धोक्यात टाकून वाहन चालवाले लागत असून, वाहन चालकांना धोक्याची घंटा आहे. तेही हे अपघात शिवनेरी धाबा ते कासटवाडीपर्यंत फक्त ३ कि.मी. अंतरावर असे अनेक अपघात वारंवार घडत आहेत. त्यामुळे या महिनाभरात दोन युवकांचा बळी गेला आहे. तर १० जण गंभीररित्या जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने गंभीररित्या लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूने वळणावर दुतर्फा झाडे, झुडपे वाढली आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहने सहजासहजी दिसत नाही. रस्ता चांगला असल्याने वाहने देखील वेगाने येतात. वळनावरील वाढलेल्या झुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे अनेक लहान मोठे अपघात सतत घडत आहेत.जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत चौकशी केली असता, रस्त्याच्या साईट पट्टीची झाडे, झुडपे कटिंग करायला जव्हार वनविभाग परवानगी देत नसल्याचे बांधकाम अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच रस्त्याच्या बाजूला साईड पट्टीचे कामही व्यविस्थत नसल्यामुळे अपघात सतत घडत आहेत. यामुळे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अपघाता आकडा वाढल्याने तेथे बोर्ड लावण्याची मागणी होत आहे.रस्त्याच्या साईट पट्टीची झाडे झुडपे तोडायला वनविभाग परवानगी देत नाहीत. त्यामुळे आम्हला अडचण आहे.- डी.जी.होले. उपविभागीय अधिकारी, सा.बांधकाम जव्हार.रस्त्याच्या साईटची लहान झुडपे कापायची आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने पत्र देवून झाडे, झुडपांची किटंग करावी. आमची काहीच अडचण नाही. - कुलदीप पातकर, वनपरिक्षेत्र अधिकारी

टॅग्स :Accidentअपघात