शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

जव्हार, वाडा येथे शिवसेना विजयी ; सवरा, भाजपाचा वाड्यात दारूण पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 01:50 IST

अत्यंत चुरशीने लढविली गेलेली वाडा नगरपंचायतीची पहिली निवडणूक शिवसेनेने जिंकली. तिच्या गीतांजली कोळकेर या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांची कन्या व भाजपाच्या उमेदवार निशा सवरा यांचा दणदणीत पराभव करून विजयी झाल्या.

वाडा/जव्हार/डहाणू : अत्यंत चुरशीने लढविली गेलेली वाडा नगरपंचायतीची पहिली निवडणूक शिवसेनेने जिंकली. तिच्या गीतांजली कोळकेर या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांची कन्या व भाजपाच्या उमेदवार निशा सवरा यांचा दणदणीत पराभव करून विजयी झाल्या. तर शिवसेनेने पंचायतीची सत्ता मित्रपक्षांच्या साथीने प्राप्त केली. जव्हारमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत पटेल नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले तर सेनेने एकहाती सत्ता मिळविली. तर डहाणूमध्ये आयाराम गयारामांच्या बांधलेल्या मोटेच्या जोरावर भाजपने नगरपालिकेची सत्ता मिळविली. तर तिचे उमेदवार भरत रजपूत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. या निकालांमुळे पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेना मजबूत झाली तर भाजपला जबरदस्त हादरे बसले. राष्टÑवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांचीही या निवडणुकीत पार धुळधाण झाली. राष्टÑवादीला जव्हारची सत्ता गमवावी लागली. तर भाजपला वाड्याची सत्ता गमवावी लागली. ही दोनही सत्तास्थाने शिवसेनेने काबीज केलीत. दोनच महिन्यांपूर्वी नियुक्त झालेले पालघरचे संपर्कप्रमुख विधानपरिषदेचे आमदार रवींद्र फाटक आणि निवडणूक मोहीमेचे सूत्रधार सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यूहरचनेमुळे हा विजय सेनेला प्राप्त झाला आहे.वाडा नगरपंचायतीवर भगवा -वसंत भोईर ।लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत राज्याचे आदिवासी विकास मंत्री व पालकमंत्री विष्णू सवरा यांना जोरदार धक्का देऊन शिवसेनेने नगरपंचायतीवर भगवा फडकवला आहे. शिवसेनेच्या गीतांजली कोळेकर यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ३ हजार ११९ मते मिळवून सुमारे ४४२ मताधिक्क्याने सवरा यांची कन्या निशा सवरा हिचा दारूण पराभव केला आहे. भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. मात्र मतदारांनी सवरा यांना झिडकारल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत शिवसेना व भाजप प्रत्येकी सहा जागांवर विजयी झाले असून काँग्रेस दोन, बविआ एक रिपिब्लकन पक्ष एक तर राष्ट्रवादी एक जागेवर विजयी झाले आहेत.निशा सवरा यांना २ हजार ६७७ मते मिळाली. त्या ४४२ मतांनी पराभूत झाल्या. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या अमृता मोरे यांना १ हजार १०५ तर काँग्रेसच्या सायली पाटील यांना ८३९ मते मिळवून त्या चौथ्या क्र मांकावर फेकल्या गेल्या. प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपचे रामचंद्र भोईर हे विजयी झाले आहेत. त्यांना २४३ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पधीॅ उमेदवार शिवसेनेचे रविंद्र कामडी यांना १४९ मते मिळाली. प्रभाग क्र मांक दोन मधून भाजपचे अरूण खुलात हे विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय तरे हे पराभूत झाले. क्र मांक ३ मधून भाजपचे वैभव भोपातराव यांनी शिवसेनेचे श्रीकांत आंबवणे यांचा ८ मतांनी पराभव केला.प्रभाग क्र मांक ३ मधून शिवसेनेच्या नयना चौधरी यांनी भाजपच्या कविता गोतारणे यांचा पराभव केला आहे. प्रभाग क्र मांक पाच मधून भाजपच्या अंजनी पाटील ह्या विजयी झाल्या आहेत. त्यांनी मनसेच्या ताराबाई डेंगाणे यांचा ४७ मतांनी पराभव केला आहे. प्रभाग क्र मांक ६ मधून भाजपच्या रिमा गंधे यांनी शिवसेनेच्या रश्मी गंधे यांचा पराभव केला आहे. प्रभाग सात मधून शिवसेनेचे संदीप गणोरे विजयी झाले असून त्यांनी बविआ चे देवेंद्र भानुशाली यांचा पराभव केला आहे. ८ मधून शिवसेनेच्या शुभांगी धानवा यांनी १७० मते मिळवून भाजपच्या अश्विनी डोंगरे यांचा ५७ मतांनी पराभव केला. प्रभाग क्र मांक ९ मध्ये बविआ चे विसम शेख निवडून आले आहेत.प्रभाग क्र मांक १० मधून भाजपचे मनिष देहेरकर हे निवडून आले आहेत. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विकास पाटील यांचा १०८ मतांनी दारूण पराभव केला. या प्रभागात सर्वात जास्त म्हणजेच १० उमेदवार रिंगणात होते. प्रभाग क्रमांक ११ मध्ये शिवसेनेच्या जागृती काळण, प्रभाग क्र मांक १२ काँग्रेसच्या भारती सपाटे, प्रभाग क्र मांक १३ शिवसेनेच्या उर्मिला पाटील, प्रभाग क्र मांक १४ रिपिब्लकन पक्षाचे रामचंद्र जाधव, प्रभाग १५ काँग्रेसच्या विशाखा पाटील, प्रभाग १६ मध्ये शिवसेनेच्या वर्षा गोळे तर प्रभाग क्र मांक १७ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुचिता पाटील या विजयी झाल्या आहेत.डहाणू नगरपरिषदेत कमळ -शौकत शेख।लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : बहुचर्चीत डहाणू नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे भरत रजपूत निवडून आले असून २५ पैकी १५ नगरसेवकपदी भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीला ८ जागांवर तर शिवसेनेला २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे या निकालाबाबत राष्ट्रवादीचे आ. आनंद ठाकूर यांनी संशय व्यक्त केला आहे.काही फ़रकाने राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक पराभूत झाल्याने आ.आनंद ठाकूर यांनी इव्हिएम मशिन आणि निवडणूक प्रक्रीयेबाबत संशय व्यक्त केला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे भरत राजपूत यांनी राष्ट्रवादीचे मिहीर शहा यांना २६०९ मतांनी पराभूत केले.प्रभाग १ ( अ) भावेश देसाई (राष्ट्रवादी ) ४८१ मते, प्रभाग १ (ब) उर्मिला नामकोडा (भाजपा ) ६०६ मते , प्रभाग २ (अ)रश्मी सोनी (भाजपा ) ११२० मते , प्रभाग २ (ब)विक्र म नायक (भाजपा) १०६८मते ,प्रभाग ३(अ) तारा बारी (भाजपा) ९०२ मते, प्रभाग ३ (ब) रोहिंग्टन झाईवाला (भाजपा) ८९० मते, प्रभाग ४ (अ) रमेश काकड (भाजपा) ७३६ मते , प्रभाग ४ ( ब) चंद्रकला सिंह ( भाजपा) ६४६ मते, प्रभाग ५ (अ) तनुजा धोडी ( भाजपा) ११०७ मते, प्रभाग ५ (ब) अनिता माच्छी (भाजपा) ११८० मते ,प्रभाग ५ (क )जगदीश राजपूत ( भाजपा) ११२५ मते, प्रभाग ६ (अ) निमिल गोहिल (भाजपा) ४४१४ मते ,प्रभाग 6 (ब)छाया बोथरा( भाजपा) ३६४ मते, प्रभाग ७ (अ)भास्कर जिटिथोर (भाजपा) ७२४ मते, प्रभाग ७ (ब) कविता बारी (राष्ट्रवादी ) ६९९ मते, प्रभाग ८ (अ), वासू तुंबडे (शिवसेना) ११९० मते , प्रभाग ८(ब) श्वेता पाटील (शिवसेना) १४५८ मते , प्रभाग ९ (अ)दिपाली मेहेर ( राष्ट्रवादी ) ८०२ मते ,प्रभाग 9(ब)समीउद्दीन पीरा(राष्ट्रवादी ) ८७३ मते , प्रभाग १० (अ) किर्ती मेहता( राष्ट्रवादी ) १२९६ मते , प्रभाग १० (ब)राजेंद्र माच्छी(राष्ट्रवादी )१२०२ मते ,प्रभाग ११ (अ)तन्मय बारी ( राष्ट्रवादी) ७४५ मते, प्रभाग ११ (ब)कविता माच्छी( राष्ट्रवादी ) ७७४ मते , प्रभाग १२ (अ) भूषण सोरठी (भाजपा) ८४१ मते , प्रभाग १२ (ब)भारती पाटील(भाजपा) ८५१ मतांनी विजयी झाले आहेत.दरम्यान या निवडणुकीत डहाणू नगर परिषदेत राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष मिहीर शहा, माजी नगराध्यक्ष शशीकांत बारी, माजी नगरसेविका रेणूका राकामुथा, माजी उपनगराध्यक्ष प्रदिप चाफेकर, भाजपच्या उमेदवार माजी नगराध्यक्षा रमिला पाटील , तर शिवसेनेतून माजी नगरसेवक श्रावण माच्छी, काँग्रेसचे माजी नगरसेवक सईद शेख, या दिग्गजांचा झालेला पराभव डहाणूत चर्चेचा विषय झाला आहे.जव्हार पालिकेत सेनेची सत्ताहुसेन मेमन।लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : जव्हारकरानी शेवटी अपक्षाना धूळ चारून शिवसेनेला कौल दिला असून सेनेने जव्हार नगरपरिषदेवर भगवा फडकाविला आहे. एकूण १७ जागांसाठी झालेल्या या निवडणूकीत शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार चंद्रकांत पटेल हे १९२ मतांनी विजयी झाले तर सेनेने ९ नगरसेवक विजयी करून पालिकेवर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले यावेळी गतवेळी सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीला अवघ्या ६ जागांवर समाधानी राहावे लागले तर जव्हार प्रतिष्ठान आणि भाजप युतीला मतदारांनी नाकारले असून त्यांच्या पदारात केवळ २ जागा टाकल्या.अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीचा निकाल अपेक्षेनुसार लागला आहे. १७ पैकी एक नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या ९ अशा १० जागा जिंकून शिवसेनेने सत्ता काबीज केली आहे. तर राष्ट्रवादीला ६ जागा मिळाल्याने त्याला विरोधी पक्षनेतेपदावर समाधान मानावे लागणार आहे. मात्र सुरवातीपासून मोठ्याप्रमाणावर चर्चेत असलेल्या जव्हार प्रतिष्ठानचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत पाटील यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नंबर दोनची मते मिळविलीत मात्र प्रभाग निहाय त्याचे नगरसेवकपदाचे उमेदवार पुरते ठेपाळले. तर ५ जागा लढविणाºया भाजपाला एका जागेवर यश मिळाले स्वबळावर निवडणूक लढणाºया कॉंग्रेसचा मात्र सुपडा साफ झाला.जव्हारच्या निवडणुकीत शेवटी शेवटी वैयक्तिक पातळीवरही प्रचार झाला मात्र त्याला जव्हारकरांनी भीक न घालता शिवसेनेला पसंती दिली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष रियाज मनियार शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष गणेश राजपूत माजी नगरसेविका मनिषा वाणी आशा बल्लाळ यांना पराभवाची धूळ चाखावी लागली तर दुसरीकडे रजपूत आणि मनियार या दोघांच्या सौभाग्यवती मात्र निवडून आल्यात. एकूणच दिग्गजांच्या प्रचार सभा, निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक रसद कार्यकर्त्यांची फौज आणि शेवटच्या क्षणापर्यंत जागरुक राहिलेले शिवसैनिक यांच्या बळावर ही निवडणूक सेनेला जिंकता आली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाVasai Virarवसई विरार