शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील शिवसेना नेते विजय पाटील यांची काँग्रेस पक्षामध्ये घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 23:47 IST

शिवसेनेने हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात दिली होती उमेदवारी

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसईत २०१९ ला  शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढविलेले विजय पाटील यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. मंगळवारी संध्याकाळी मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे पालघर जिल्ह्यातील निवडक पदाधिकारी व किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्ठे आदींच्या उपस्थितीत हा  पक्षप्रवेश झाला.

विजय पाटील यांनी शिवबंधन बांधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असलेले विजय पाटील हे नंतर बहुजन विकास आघाडी आणि नंतर शिवसेनेमध्ये गेले होते. पालघर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार म्हणून हा पक्षप्रवेश झाला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे. 

पालघर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्तीवसईचे आमदार व बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर शिवसेना उमेदवार म्हणून पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. आता त्यांनी काँग्रेस प्रवेश केल्यानंतर नाना पटोले यांनी त्यांना पालघर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष केले आहे. दरम्यान, काँग्रेसने खासदारकीची उमेदवारी दिली नाही तर विजय पाटील नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का, अशीही चर्चा वसईकर करीत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcongressकाँग्रेस