शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विस्तव न जाणारे शिवसेना-बविआ नेतृत्व आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 23:42 IST

अग्नितांडवानंतर आढावा बैठक 

लोकमत न्यूज नेटवर्क वसई : वसई-विरारच्या राजकारणात सत्ताप्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असलेली शिवसेना आणि महापालिकेच्या स्थापनेपासून सत्तेवर असलेली बहुजन विकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एरवी विस्तवही जात नाही. मात्र, शुक्रवारी या दोन्ही पक्षांचे नेते अग्नितांडवाच्या घटनेनंतर एकत्र आल्याचे आणि किमान तासभर त्यांनी आढावा बैठक घेतल्याने आगीच्या घटनेबरोबरच या बैठकीचीही चर्चा शहरात सुरू होती.विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेसंदर्भात व वसई-विरार महापालिका हद्दीतील पालिका व खाजगी रुग्णालयांतील सोयी-सुविधा, दक्षता आणि रुग्णांना सुरक्षितता अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी या जळीत घटनेच्या निमित्ताने का होईना, मात्र कधी एकमेकांना न भेटणारे किंवा संपर्कात नसणारे शिवसेनेचे नेते मात्र विरार दरबारी शुक्रवारी सकाळी एकत्र आले.याप्रसंगी विजय वल्लभ रुग्णालयाला भेट दिल्यानंतर शिवसेना व बविआ नेतृत्व एकत्रित येऊन त्यांनी विरारच्या विवा कॉलेजमधील आ. हितेंद्र ठाकूर यांच्या बविआ पक्ष कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी सकाळी ११ वाजता एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली.यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, माजी महापौर प्रवीण शेट्टी, आयुक्त गंगाथरन डी. आदी यावेळी उपस्थित होते. तासभर संपन्न झालेल्या या आढावा बैठकीत महापालिका हद्दीतील सर्व रुग्णालयाचे फायर ऑडिट, शहरात अपुरा असलेला ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिविर इंजेक्शन, औषधे त्याचबरोबर रुग्णालय सोयी-सुविधा आणि रुग्णांची सुरक्षितता यामध्ये प्रामुख्याने शहरातील मोठ्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजन प्लांट उभारणी करण्यास मदत करणे व त्यांना यासाठी शासनाच्या वतीने सबसिडी देणे, तसेच बंद औद्योगिक वसाहती आस्थापना आहेत. त्यांच्याकडून रिकामी सिलिंडर्स मागवून घेणे अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. यावेळी पालकमंत्री भुसे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या आढावा बैठकीत झालेल्या सर्व विषय व समस्येची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाईल आणि स्थनिक पातळीवर जे काही करता येईल त्याबाबत पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी लक्ष केंद्रित करायच्या सूचना या बैठकीत मंत्री व पालकमंत्री यांनी दिल्या.

ऑक्सिजन आणि रेमडेसिविर उपलब्ध करण्यावर झाली चर्चाnविरार : विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर पालकमंत्री, नगरविकास मंत्री यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला. nबैठकीत पालिका हद्दीतील रुग्णालयांचे फायर ऑडिट, मोठ्या रुग्णालयाला ऑक्सिजन प्लँट उभारण्यास मदत करणे, त्यांना यासाठी सबसिडी देणे, बंद इंडस्ट्रीजकडून रिकामी सिलिंडर मागून घेणे, ज्याचा उपयोग ऑक्सिजन भरण्यासाठी होऊ शकेल, अशा बाबींवर चर्चा करण्यात आली. 

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीरShiv Senaशिवसेना