शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

खाडीपुलाला जहाजाच्या धडकेने रेल्वे वाहतुकीला होणार धोका?, दोन जहाज चालक-मालकांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 02:08 IST

Nalasopara : नायगाव वसई खाडी येथील रेल्वेच्या फास्ट ट्रॅकवरील रेल्वे ब्रिजवरील पोल क्रमांक ४६/६ सी येथे शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांच्या ताब्यातील दोन जहाजे विनापरवाना आणून ती पुलाखालून जात असताना पुलाला धडक बसली होती.

नालासोपारा : नायगाव येथील रेल्वे पुलाच्या बीम आणि पिलरला शुक्रवारी रात्री एक जहाज धडकल्याने हा पूल रेल्वे वाहतुकीसाठी धोकादायक ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पुलाला धडक दिल्याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी शनिवारी दोन जहाज चालक, मालक आणि स्पीड बोटीवरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास रेल्वे पुलाला जहाजाने धडक देण्याची घटना घडली होती.नायगाव वसई खाडी येथील रेल्वेच्या फास्ट ट्रॅकवरील रेल्वे ब्रिजवरील पोल क्रमांक ४६/६ सी येथे शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांच्या ताब्यातील दोन जहाजे विनापरवाना आणून ती पुलाखालून जात असताना पुलाला धडक बसली होती. या घटनेनंतर धडक बसलेले जहाज खाडीतील पाण्यात बुडाले आहे. कोणत्याही यंत्रणेची परवानगी न घेताच होत असलेल्या अशा प्रकारच्या वाहतुकीमुळे आगामी काळात पुलाला मोठा धोका संभवत आहे.रेल्वे पुलाच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता निष्काळजीपणे वसई खाडीतून पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे घेऊन जात असताना लोकल लाइनच्या ब्रिजचे गर्डर (बीम) आणि पिलरला धडकून अपघात झाला होता. या अपघातामध्ये रेल्वे ब्रिजच्या मालमत्तेचे जाणीवपूर्वक नुकसान करून लोकांच्या जीवितास धोका निर्माण करण्यास कारणीभूत झाले. या प्रकरणी रेल्वेचे अधिकारी अनिलकुमार कमलाप्रसाद शुक्ला (४५) यांनी शनिवारी माणिकपूर पोलीस ठाण्यात दोन जहाज चालक, मालक आणि स्पीड बोटीवरील तिघांविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांची कारवाईला सुरुवात   मुंबई आणि गुजरात या राज्यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील हा अत्यंत महत्त्वाचा पूल आहे. मुंबई ते वसई-विरार आणि डहाणूपर्यंतची उपनगरी लोकल सेवा याच मार्गावरून होत असते. तसेच गुजरात, राजस्थान आदी राज्यांसाठी एक्प्रेस गाड्या धावत असतात. यामुळे पुलाला जहाजाची धडक बसल्याने पूल धोकादायक होण्याचीही भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांनी या प्रकरणी रीतसर कारवाई सुरू केली आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार