शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याची हत्या; फरार भावाला बेड्या, पालघर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 07:25 IST

Crime News: पालघर जिल्ह्यातील घोलवड येथील शिंदेसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला त्यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडी याला स्थानिक गुन्हे शाखेने केंद्रशासित प्रदेश सिल्वासा येथून अटक करण्यात यश मिळवले आहे.  

पालघरपालघर जिल्ह्यातील घोलवड येथील शिंदेसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचे अपहरण आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला त्यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडी याला पालघरचे नवनिर्वाचित पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेने केंद्रशासित प्रदेश सिल्वासा येथून अटक करण्यात यश मिळवले आहे.  आरोपीस १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी अविनाश याला अटक केली होती, मात्र घोलवड पोलिसांच्या ताब्यातून पळून जाऊन फरार झाला होता.

अशोक धोडी यांचे १९ जानेवारी रोजी वेवजी घाटातील हिलझील डोंगराच्या वळणावर अपहरण केल्यानंतर त्यांचा मृतदेह ३१ जानेवारी रोजी गुजरात राज्यातील भिलाडजवळील सारीग्राम येथे एका बंद दगडखाणीत टाकलेल्या त्यांच्या कारमध्ये सापडला होता. पालघर पोलिसांनी याप्रकरणी तातडीने तपास करत आरोपी अविनाश धोडी, विशाल गोरात, रवींद्र मोरगा, सतीश दुमाडा आणि संतोष धिंडे यांना अटक केली होती. त्यांना त्यावेळी स्थानिक न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र अविनाश घोलवड पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यात यशस्वी ठरला होता.

दारू विक्रीसाठी ठरत होता अडसर अनेक महिने तपास करूनही तो सापडत नसल्याने पालघर पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. दमण आणि सिल्वासा येथील दारू महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी आणण्याच्या गोरख धंद्यात अडसर ठरत असल्याच्या कारणातून अशोक धोडी यांचे अपहरण आणि हत्या केल्याची माहिती पोलिसांसमोर आली होती.

तीन साथीदार अद्याप फरार पालघर पोलिसांनी अनेक पथके नेमल्यानंतरही अविनाश हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर पालघरचे नवे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अंकिता कणसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अनिल व्हटकर, पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल सावंतदेसाई, गोरखनाथ राठोड, रोहित खोत, राजेश वाघ, सुनील नलावडे, दीपक राऊत, नरेंद्र पाटील, भगवान आव्हाड, विजय ठाकूर आदींच्या पथकाने केंद्रशासित प्रदेश असलेल्या सिल्वासा येथील एका घरात लपून बसलेल्या अविनाशच्या मुसक्या आवळल्या. अद्याप या प्रकरणात आरोपीचे तीन साथीदार फरार आहेत. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :palgharपालघरCrime Newsगुन्हेगारी