शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वसईत आढळल्या शिलाहार राजवटीतील शिळा, दुर्लक्ष झाल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 23:53 IST

History News : वसईतील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर (वसई गाव) परिसरात शिलाहारकालीन गद्धेगाळ शिळा रविवारी सकाळी सापडल्या आहेत.

नालासोपारा - वसईतील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर (वसई गाव) परिसरात शिलाहारकालीन गद्धेगाळ शिळा रविवारी सकाळी सापडल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांत ऊन, पाऊस, वारा या नैसर्गिक प्रभावात शेवाळ, माती, चिखल साचून पूर्णपणे दुर्लक्षित शिळा अंतिम घटकेत नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या. यावर मंगलकलश, कोरीव शिवलिंग, गध्येगाळ प्रतिमा सहा ओळींचा शिलालेख आदी आढळून आले आहे.किल्ले वसई मोहीम अंतर्गत गेली १८ वर्षे सातत्याने दुर्ग संवर्धन व इतिहास संकलन मोहीम सुरू आहे. यातील इतिहास संकलन मोहीम अंतर्गत वसईतील ऐतिहासिक स्थळांचे नोंदणीकरण सुरू आहे. याच मोहिमेचे औचित्य साधून श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या आवारातील अप्रसिद्ध शिलालेखाचा प्रथमच वेध घेण्यात आला. यातील जुन्या मराठी देवनागरी शिलालेखाचे  वाचन करण्यात आले. या शिलालेखाचा सविस्तर तपशील लवकरच विविध लेखमाला, शासकीय व संशोधन त्रैमासिक माध्यमातून अभ्यासकांपुढे प्रसिद्ध होणार आहे.किल्ले वसई मोहिमेचे इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांच्या माध्यमातून समस्त किल्ले वसई मोहीम प्रतिनिधींनी रविवारी शिलालेख महाराष्ट्रात प्रथमच उजेडात आणला. सकाळी ८ ते १२ या वेळेत हा दुर्लक्षित शिलालेख व शिळा पुरातत्वीय दृष्टीने स्वच्छता करून संवर्धन केला. जिल्ह्यातील मांडवी, रांजली, आगाशीसोबतच श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात नवीन शिलालेखाची नोंद करण्यात आली आहे. रविवारच्या मोहिमेत डॉ. श्रीदत्त राऊत, दीपाली पावसकर, प्रशांत सातवी, भरत पाटील, दिव्या राऊत, दुर्वी राऊत, प्रीतम पाटील यांनी सक्रिय योगदान दिले. ऐतिहासिक संदर्भकेशीदेव, अपरादित्य, हरिपालदेव, मल्लीर्जुन, अपरादित्य द्वितीय, सोमेश्वर या ठाणे शिलाहार राजांच्या राजवटीचे उल्लेख कोकणातील आगाशी, भिवंडी इत्यादी ठिकाणी सापडलेल्या शिलालेखांतून मिळतात. उत्तर कोकणात शिलाहारांचे राज्य ४०० वर्षे होते. उत्तर कोकणातील शिलाहारांचा कालावधी इ.स ८०० ते १२६५ असा मानण्यात येतो. 

टॅग्स :historyइतिहास