शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सूर्या प्रकल्पाच्या पाण्यापासून ‘ती’ गावे वंचित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 01:20 IST

पाच वर्षांपासून संघर्ष : शेतकऱ्यांच्या आंदोलनाची अन् तत्कालीन खासदारांच्या मागणीचीही दखल नाही

शशिकांत ठाकूर

कासा : पालघर जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरलेला सूर्या प्रकल्प  शहरांची तहान भागवत आहे, मात्र या प्रकल्पापासून जवळ असलेल्या सोमटा परिसरातील अनेक गावे सूर्या प्रकल्पाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत असून आजही अनेक गावांना पाणी मिळालेले नाही. दरम्यान, या गावांना पाणी मिळण्यासाठी पाच वर्षांपूर्वी तत्कालीन खासदार चिंतामण वनगा यांनीही प्रयत्न केले होते, तसेच सोमवारपासून तवा येथे शेकडो शेतकरी प्रकल्पाच्या पाण्यासाठी उपोषणाला बसले आहेत, परंतु त्याची प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीची भावना व्यक्त होत आहे.सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांतर्गत डहाणू, पालघर व विक्रमगडमधील काही गावांना उन्हाळ्यात शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. या कालव्यांतर्गत मिळणाऱ्या पाण्यातून या परिसरात मोठ्या प्रमाणात भातशेती व भाजीपाला लागवड शेतकरी करतात. त्यामुळे येथील लोकांना रोजगारासाठी बाहेर जावे लागत नाही.

दुबार पिकामुळे शेतकऱ्यांनाही उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेता येते, मात्र सूर्या प्रकल्पापासून अवघ्या १२ ते १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमटा परिसरातील विक्रमगड तालुक्यातील करसोड, कोंडगाव, वेडे, घाणेडा, विलशेत, भोपोली, चिंचघर, पाचमाड अशा दहा ते बारा गावांतील शेतकरी वारंवार मागणी करूनही अद्यापही सूर्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. या भागातील आदिवासी शेतकरी उन्हाळ्यात विहीर, मोटारपंप, ओहळ, नाल्यातील व इतर पाण्याच्या साह्याने भाजीपाला लागवड करतात. मात्र त्यांना पाणी कमी पडत असल्याने अनेक शेतकऱ्यांना आपली शेती करता येत नाही. याची दखल घेत २०१६ साली माजी खासदार चिंतामण वनगा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे सूर्या धरणाचे पाणी कालव्यातून या गावांतील शेतकऱ्यांना शेतीसाठी देण्याची मागणी केली होती, मात्र अद्यापही शेतकऱ्यांना सूर्या कालव्याचे पाणी मिळालेले नाही. मात्र आता कवडास धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू असून पाइपद्वारे सूर्या प्रकल्पाचे पाणी मीरा-भाईंदर क्षेत्राकडे नेले जाणार आहे. त्यामुळे सोमटा परिसरातील गावांतील शेतकऱ्यांनी कालव्यांतर्गत शेतीसाठी आम्हाला पहिले पाणी मिळावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, मीरा-भाईंदरकडे पाणी देण्यासाठी या परिसरातील शेतकऱ्याने विरोध दर्शवला असून या व इतर काही मागण्या घेऊन सोमवारपासून तवा येथे शेकडो शेतकरी उपोषणालाही बसले आहेत.

आंदोलनाला शेकडो शेतकऱ्यांचे समर्थन सूर्या धरणाचे पाणी शेतीसाठी प्राधान्याने दिले पाहिजे, लाभक्षेत्रातील प्रत्येक गावाला पिण्याचे पाणी घरोघरी मिळाले पाहिजे, स्थानिक ग्रामसभा वनहक्क समित्या यांच्या ठरावाला न्याय सन्मान मिळाला पाहिजे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे असून आपल्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी समर्थन दिले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार