- रवींद्र साळवेमोखाडा : कुपोषण आणि पाणीटंचाईविषयी संवेदनशील असलेल्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात फेब्रुवारीच्या अखेरीसच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईने होरपळणाऱ्या आसे ग्रामपंचायतीमधील सहा गावपाड्यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी पंचायत समिती प्रशासनाकडे केल्याने मोखाड्यात पाणीटंचाईची पहिली ठिणगी पडली आहे. दरम्यान, गतसाली मोखाड्यातील टंचाईग्रस्त गाव पाड्यांनी शंभरी ओलांडली होती.‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे मोखाड्यात प्रतिवर्षी जानेवारी अथवा फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईला सुरुवात होते. गतसाली जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाणीटंचाईला सुरुवात झाली होती. तर ९ जानेवारीला पहिला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र, यंदा पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्याने समाधान व्यक्त केले जात होते, परंतु यंदा फेब्रुवारीच्या अखेरीस टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी झाली आहे. गतसाली पाणीटंचाईने मोखाडा तालुका होरपळून निघाला होता. ११६ गावपाड्यांना २७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाही ऊन्हाची तीव्रता वाढू लागताच टंचाईला सुरुवात झाली आहे.टंचाईग्रस्त गावपाड्यांची टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी येताच, त्यांची तातडीने तहसीलदार विजय शेट्ट्ये, गटविकास अधिकारी संगीता भांगरे व पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. गावपाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. शासनाच्या धोरणानुसार टंचाईग्रस्त गावपाड्यांची पाहणी केल्यानंतर त्यांना ४८ तासाच्या आत टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अनिवार्य आहे. मात्र येथील आदिवासींना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.१ कोटी ८६ लाखाच्या टंचाई आराखड्याला मंजुरीया वर्षी २९ गावे आणि ७७ पाडे अशा एकूण १०६ टंचाईग्रस्त गावपाड्यांचा १ कोटी ८६ लाख रुपयांचा टंचाई आराखडा मोखाडा पंचायत समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला होता. या आराखड्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी दिली आहे. यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा, हातपंप, विहिरी अधिग्रहण करणे, विहिरीतील गाळ काढणे, विहिरी खोलीकरण करणे आदी कामांना मंजुरी देण्यात आली आहे.टंचाईग्रस्त गावपाड्यांची टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी येताच, संबंधित गावपाड्यांची पाहणी केली आहे. तसेच या गावड्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे. - विजय शेट्ट्ये,तहसीलदार, मोखाडा.मोखाड्यात पाणीसाठ्याचे प्रकल्प तसेच बंधारे आहेत. त्यामध्ये पाणीसाठा देखील आहे. मात्र, प्रशासनाच्या नियोजनाअभावी तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात ठेकेदार अथवा अधिकाºयांनी कसुराई केली आणि टंचाईग्रस्त भागातील नागरिकांनी तक्र ार केल्यास त्यांची गय केली जाणार नाही.- सारिका निकम, सभापती, पंचायत समिती मोखाडा.
मोखाडा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; सहा गावपाडे तहानले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:43 PM