शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी सातवी महापौर मॅरेथॉन, १८ हजारांहून अधिक स्पर्धकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:17 IST

पूर्ण मॅरेथॉनमध्ये तब्बल ६४० धावपटू, अर्ध मॅरेथॉनमध्ये सुमारे चार हजार धावपटूंसह तब्बल १८ हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग असलेली वसई विरार महापौर मॅरेथॉन येत्या रविवारी रंगणार आहे.

वसई : पूर्ण मॅरेथॉनमध्ये तब्बल ६४० धावपटू, अर्ध मॅरेथॉनमध्ये सुमारे चार हजार धावपटूंसह तब्बल १८ हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग असलेली वसई विरार महापौर मॅरेथॉन येत्या रविवारी रंगणार आहे. राहूल बोस आणि मंदिरा बेदी स्पर्धेचे ब्रँड अ‍ॅम्बेसडर आहेत.यंदाच्या शर्यतीत पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये ६४० धावपटू सहभागी होणार असून त्यात भारतातील सर्वोत्तम धावपटू असलेले रशपाल सिंग, पंकज धाका, सनातन सिंग, भरत प्रकाश, अनु सथ्यादास, जी. बी. पाटले, कालिदास हिरवेवर, प्रदीप सिंग, मानसिंग, गोविंद सिंग, चंद्रकांत मानवडकर, सावहीन पाटील यांचा समावेश आहे. तर महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये भारतातील आघाडीच्या स्वाती गाढवे, मोनिका आथरे, मोनिका राऊत, मिनाक्षी पाटील, मनीषा साळुंखे या धावपटू धावणार आहेत.पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉन विजेत्याला अडीच लाखाचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. पुरुष व महिला अर्ध मॅरेथॉन विजेत्याला सव्वा लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे.स्पर्धेत अनेक अधिकारीही धावणार आहेत. यामध्ये अनुप कुमार सिंग, मंजुनाथ सिंगे, जयंत बजबळे आदी पोलीस अधिकाºयांचा समावेश आहे. तर उपजिल्हाधिकारी माया पाटोळे, जिल्हा उपनिबंधक सतीश देवकाते हेही धावणार आहेत.अर्ध मॅरेथॉनमध्ये चार हजारांहून अधिक हौशी धावपटू धावणार आहेत. ११ किलोमीटरच्या स्पर्धेत दोन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. त्याचबरोबर ज्युनियर शालेय वयोगट शर्यतीत चार हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत.बॅटल रन स्पर्धा मॅरेथॉनचे मुख्य आकर्षण असून यंदा यात ३१ संघ अर्धमॅरेथॉन आणि पाच किलोमीटर डॅशमध्ये सहभागी झाले आहेत. संघातील सदस्यांच्या एकत्रित वेळेवरून विजेता संघ निवडण्यात येणार आहे. अर्ध मॅरेथॉन बॅटल रनमधील सर्वोत्तम रनिंग क्लबला दीड लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघाला ९० हजार रुपये आणि तृतीय संघाला ६० हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.विशेष मॅरेथॉन ट्रेन : मॅरेथॉनसाठी परेकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. चर्चगेट स्थानकातून ही ट्रेन पहाटे ३ वाजता सुटेल. ही ट्रेन वसईला पहाटे ४.२३ आणि विरारला पहाटे ४.३१ वाजता पोचेल. स्पर्धेच्या ठिकाणी पोचण्यासाठी वसई स्टेशन व विरार स्टेशन येथून वाहतूकीची व्यवस्था आहे.