शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आगरी भवनाच्या बांधकामाला सातबाराचे ‘ग्रहण’

By admin | Updated: April 12, 2017 03:55 IST

वसई व पालघर तालुक्यात विखुरलेल्या आगरी समाज बांधवांच्या संकिल्पत आगरी भवनांचे काम सातबाऱ्यामुळे रखडले असून २००७ साली शासनाच्या नियमांना अधीन राहून

- सुनिल घरत,  पारोळ

वसई व पालघर तालुक्यात विखुरलेल्या आगरी समाज बांधवांच्या संकिल्पत आगरी भवनांचे काम सातबाऱ्यामुळे रखडले असून २००७ साली शासनाच्या नियमांना अधीन राहून १,८०,००० हजार रु पये मूल्यांकन भरले असले तरी अजूनही आगरी समाज उन्नती मंडळाच्या बांधकाम समितीला शासनाकडून सातबारा मिळाला नाही.या बाबीचा पाठपुरावा उन्नती मंडळाद्वारे सुरूच असून मागील दहा वर्षांच्या शासन दिरंगाईमुळे वाढलेल्या बांधकाम मूल्याची भरपाई देण्याची मागणीही मंडळामार्फत करण्यात आली आहे. याशिवाय गेल्या काही वर्षात मंडळाद्वारे अनेक सामाजिक हिताच्या कामांची मागणी करण्यात आली असून काही कामे मंजूर झाली आहेत परंतु त्यांचा पुढील प्रवास लालफितीमध्ये आडकला आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणीही मंडळाकडून करण्यात आली आह. पाठपुराव करुनही शासनाकडून कोणत्याच कामाला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने मंडळाचे ६० वर्षांवरील सदस्य (यामध्ये नारायण घरत यांचे वय ९५ वर्षे आहे) मंत्रालयासमोर उपोषण करण्याच्या तयारीत असून महिन्याभरात शासनाला जाग आली नाही तर येत्या ५ मे रोजी आम्ही मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे उन्नती मंडळाचे सरचिटणीस नरिसंह पाटील यांनी सांगितले आहे.कामातील भ्रष्टाचार अन वेळकाढूपणापारगांव चेकपोस्ट ते दुर्गम आदिवासी बोरीचा पाडा रस्त्याचे काम २०११ या वर्षी तीन भागात करायचे होते. मात्र, ते एकाच भागाचे झाले असून उर्विरत काम न करता ठेकेदाराला सार्वजनिक बांधकामकडून तिन्ही भागांची सर्व रक्कम अदा केल्याची माहिती समोर आली आहे. पारगाव पुलाचे काम आदिवासी उपयोजनेतून झाले असतानाही यामार्गे केलेली टोल वसुली उपयोजनेत किती जमा झाली आहे. याची माहिती मिळावी. पारगाव, सोनावे, दारशेत ते महामार्गावरील पाचरखे, दारशेत ते उंबरपाडा रस्त्याला निधी मिळावा म्हणून पाठपूरावर सुरु आहे.दरवर्षी पावसाळ्यात उसगाव ते भाताणे हा रस्ता हमखास पाण्याखाली जातो व पलीकडील ३५ ते ४० गाव पाड्यांचा संपर्क तुटतो. हा रस्ता होत नसल्याने शिवनसई ते नवसई रस्ता व्हावा ही पर्यायी मागणी आहे. त्याचे सर्वेक्षण होऊनही योजना मात्र प्रलंबित आहे.घाटीम, नवघर, मासवण, बहाडोली या मार्गाची पुलासकट मागणी केली आहे. तसेच खानिवडे टोल नाक्यावरून पालघर व वसई तालुक्यातील हलक्या वाहनांना टोल माफी मिळावी अशी मागणी आहे.