शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

संभ्रमाची मालिका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 22:57 IST

अंबरनाथ पालिका निवडणूक : आयोगाकडून आरक्षण सोडत झालीच नाही

पंकज पाटील 

अंबरनाथ/बदलापूर : राज्य निवडणूक आयोगाचे एकावर एक येणारे आदेश हे नागरिकांना संभ्रमात टाकणारे आहेत. निवडणूक आयोगाने आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने १८ फेब्रुवारीला आरक्षण सोडत घेण्याचे निश्चित केले होते. मात्र आयोगाने कोणतेही पत्र न काढता हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. नियमानुसार आणि आयोगाच्या आदेशानुसार आज आरक्षण सोडत पार पडणे अपेक्षित होते. मात्र तो कार्यक्रम झालाच नाही आणि त्याची कल्पनाही नागरिकांना दिलीच नाही. निवडणूक आयोग हे अधिकारी आणि स्वत:चे कार्यालय यांच्यापुरतेच काम करत असल्याचे चित्र या निवडणुकीच्या कार्यक्रमातून दिसत आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन ‘अ’ वर्ग नगरपालिकेच्या निवडणूक आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या आरक्षण सोडतीच्या आदेशानुसार प्रभाग रचना निश्चित करून त्या प्रभागांची आरक्षण सोडत १८ फेब्रुवारीला घेण्यात येणार होती. मात्र नगरपालिकेने निवडणूक आयोगाकडे सादर केलेली प्रभाग रचनाच अद्याप निश्चित झालेली नाही. त्या प्रभाग रचनेलाच अद्याप मंजुरी मिळालेली नाही.निवडणूक आयोगाकडून विलंब होत असल्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढे ढकलला जाणार अपेक्षित होते. मात्र त्या संदर्भात कोणतेही आदेश आयोगाने काढले नाही.निवडणुकीचा कार्यक्रम सर्वच वर्तमानपत्रात प्रसिध्द झाल्याने याकडे सगळ््यांचे लक्ष लागले होते. आरक्षण सोडत तर दूरच १८ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेलाही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या विलंबामुळे शहरात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दुसरीकडे निवडणूक आयोग हे केवळ त्यांच्या अधिकाऱ्यांपर्यंतच आदेश देण्याचे काम करत आहेत. नागरिकांपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम जावू देत नसल्याचे समोर आले आहे. कोणताही लेखी आदेश नसताना आरक्षण सोडत पुढे गेलीच कशी हा प्रश्न उपस्थित होत आहे.पालिका अधिकारी आयोगाकडे तळ ठोकूनच्निवडणूक आयोगाकडे प्रारुप प्रभाग रचना मंजूर करण्यासाठी अधिकारी तळ ठोकून आहेत. मात्र अद्याप त्यांना मंजुरी मिळालेली नाही.च्प्रारूप आराखड्याला मंजुरी मिळाल्यावर आरक्षण सोडतीची तारीख निश्चित होईल असे मुख्याधिकारी देवीदास पवार यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथVasai Virarवसई विरार