शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

ग्रामीण रुग्णालयाची सेप्टी टॅँक तुबली, रोगराई

By admin | Updated: November 9, 2016 03:33 IST

येथील ग्रामीण रुग्णालयाची आवारातच शौचालयाच्या तुंबलेली सेप्टी टॅँक भरून वाहू लागल्याने तिच्या डबक्यात रोज हजारो डासांची उप्तती होत असल्याने रुग्णांचे

पंकज राऊत, बोईसरयेथील ग्रामीण रुग्णालयाची आवारातच शौचालयाच्या तुंबलेली सेप्टी टॅँक भरून वाहू लागल्याने तिच्या डबक्यात रोज हजारो डासांची उप्तती होत असल्याने रुग्णांचे व संपूर्ण परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधी व डासांमुळे सगळे हैराण झालेले असले तरी आरोग्य खाते आणि स्थानिक प्रशासन मात्र याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करीत आहेत.ही टाकी साफ करण्याची जबाबदारी आरोग्य खात्याची, रुग्णालयाची की, पंचायतीची असा तिढा निर्माण झाला आहे. बोईसर ग्रामीण रुग्णालयात प्रतिदिन सुमारे दोनशे बाह्य रुग्ण औषधोपचाराकरिता येत असतात तर त्यापैकी काही गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना दाखल ही करून घेण्यात येते त्याच प्रमाणे प्रसूतीसाठी ही महिला मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. बोईसरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये बोईसरसह परिसरातील सुमारे पंचवीस ते तीस गावां-पाड्यांतून नागरी वसाहतींतून गरीब तसेच आदिवासी त्याचप्रमाणे तारापूर एम्.आय्.डी.सी.मधील कामगारवर्ग व त्यांचे कुटुंब मोठ्या प्रमाणात उपचाराकरीता येत असतात.सध्या डेंग्यूसह अनेक साथींच्या आजारांची सर्वत्र लागण सुरु असून त्यामध्ये रुग्ण दगावत आहेत तर डेंग्यूच्याबाबत भयंकर भीती आहे. शासकीय यंत्रणाच म्हणते स्वच्छता राखा, घरात व आजुबाजुला पाणी व डबके साचू देऊ नका त्या मध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होऊन साथीचे आजार पसरतील परंतु याच शासनाच्या अखत्यारितील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात नेमके त्याविरुद्ध वातावरण आहे. बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील या मैल्याच्या डबक्यामध्ये डासांच्या झुंडीच्या झुंडी सर्वत्र घोंघावत आहेत. इथे उपचारासाठी आणि रोगमुक्त होण्यासाठी यायचे की, नवे विकार जडवून घेण्यासाठी यायचे असा प्रश्न रुग्णांना पडला आहे. डॉक्टर आणि नर्सेस, वॉडबॉय यांचेही आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात साचलेल्या मैल्याच्या डबक्यासंदर्भात उपाय योजना करण्यासाठी जानेवारी, मार्च व जून अशा तीन महिन्यात बोईसर ग्रामपंचायतीला पत्र देण्यात आले आहे परंतु ग्रामपंचायतीने ही या गंभीर बाबीची दखल घेतली नाही, त्या साचलेल्या डबक्यातच बाटल्या, औषधांनी भरलेले खोके टाकून देण्यांत आले आहेत. ही औषधे का टाकून देण्यांत आली त्याची चौकशी होणे गरजेचे असून योग्य विल्हेवाट न लावता जर औषधे फेकून देण्यात आली असतील तर सबंधितांवर कारवाई झाली पाहीजे अशी मागणी नागरीक करीत आहेत. तर रुग्णालयाच्या आवारामधील डासांच्या आळ््या खाऊन डासांचा नाश करणारे गप्पी मासे पैदा करण्यासाठी खास बांधलेल्या हौदाचीही कचराकुंडी झाली आहे. तिची सफाई गेल्या अनेक महिन्यांत झालेली नाही. यामुळे संपूर्ण रुग्णालय आणि परिसराचे त्यातील कर्मचाऱ्यांचे व रहिवाशांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. याबाबत पंचायत आणि प्रशासन लक्ष घालणार तरी कधी?