शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पालघर तालुक्यात सेनेचे दोन दशकांपासून निर्विवाद वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 00:59 IST

पालघर तालुक्याच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने २३ जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे.

पंकज राऊत बोईसर : पालघर तालुक्याच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने २३ जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे. मात्र तालुक्यात भाजप आणि बहुजन विकास आघाडीला २०१५ च्या तुलनेत कमी जागा मिळाल्याने त्यांची मोठी पीछेहाट झाली आहे. सेनेने पंचायत समितीवरील आपला बालेकिल्ला मागील दोन दशकांपासून कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.या निवडणुकीमध्ये काही आजी व माजी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान पंचायत समिती सदस्य तसेच पालघर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दांडी गटात शिवसेनेसह तीन मुख्य राजकीय पक्षांचे उमेदवार तर रिंगणात होतेच त्याबरोबरच ८ अपक्ष उमेदवार उभे होते. तरीही शिवसेनेचे विद्यमान जि. प. सदस्य तुळशीदास तामोरे यांनी ४८१ मताधिक्क्याने विजय मिळवला. नवापूर गणात विद्यमान पं.स. सभापती मनीषा पिंपळे यांना बविआच्या अंजली बारी व राष्ट्रवादीच्या अक्षया संखे यांनी चांगली लढत दिल्याने त्या अवघ्या ९५ मताधिक्क्याने निवडून आल्या. जिल्हा परिषदेचे विद्यमान बांधकाम सभापती सुरेश तरे हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार नवघर घाटीम येथून ६२७ मताधिक्क्याने निवडून आले. तर पालघर जिल्हा परिषदेचे विद्यमान कृषी सभापती अशोक वडे यांची मुलगी सलोनी वडे व भाजप व शिवशक्ती सामाजिक संघटनेचे उमेदवार अजय दिवे हे भाजपचे फक्त दोनच उमेदवार तालुक्यात निवडून आले आहेत. या दोन्ही जागेवरील निवडणूक राजकीय वर्तुळात प्रतिष्ठेची समजली जात होती तर विद्यमान पं.स. सदस्य मुकेश पाटील सरावली व जतीन मेर मुरबे गटातून निवडून येत पुन्हा पं.स.वर गेले आहेत. शिवसेनेने किनारपट्टीबरोबरच निमशहरी व डोंगरी भागातही चांगले यश मिळविले आहे.खैरापाडा येथे भाजपचे बंडखोर उमेदवार हरिनारायण शुक्ला यांच्यामुळे भाजपच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. शुक्ला यांना ३२७ मते मिळाली तर विजयी उमेदवार फक्त ४७ मतांनी निवडून आले. राष्ट्रवादीने २ तर मनसेने एका जागेवर विजय मिळवून पंचायत समितीत दाखल झाले आहेत. एकंदरीत तालुक्यातील काही गणात ही निवडणूक अटीतटीची झाली आहे.>भाजप जिल्ह्यातून हद्दपार२०१५ च्या निवडणुकीत बविआला १० तर या वेळी ४ जागा मिळाल्या होत्या. भाजपच्याही या निवडणुकीत दोन जागा कमी झाल्या आहेत.लोकसभेतून व विधानसभेतून पालघर जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या भाजपला कंबर कसावी लागणार आहे.

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदpalgharपालघर