शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

हंगाम लांबला : गावरान जांभळे यंदाही महाग झालीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:58 IST

निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा व दिवसेदिवस कमी होत चाललेला पाउस तसेच वातावणातील बदल त्याचा परिणाम यंदा पुन्हा एकदा आंबा व काजू बरोबरच रानमेवा असलेल्या जांभळांवरही झालेला आहे.

विक्रमगड : निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा व दिवसेदिवस कमी होत चाललेला पाउस तसेच वातावणातील बदल त्याचा परिणाम यंदा पुन्हा एकदा आंबा व काजू बरोबरच रानमेवा असलेल्या जांभळांवरही झालेला आहे. त्यामुळेच येथील येथील बाजारात गावरान जांभळाची पुरेशी आवक मे महीना सुरु झाला तरी पाहिजे त्या प्रमाणात झालेली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्यांच्या प्रतिक्षेत आहेत. सध्या बाजारात दाखल होणारी जांभळे महाग आहेत. तर वातावणातील बदलामुळे हंगाम लांबला आहे. यादरवर्षी ही गावरान जांभळे बाजारात येताच नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत असते. मात्र जांभळाचे उत्पादन कमी झाल्याने व निसर्गाच्या लहरीपणामुळे हंगाम लांबत चालेला आहे. त्यामुळे ज्यावेळेस जांभुळ उत्पादन व्हायला हवे त्यावेळेस ते होत नसून त्याच्या पिकण्याचा कालवधी लांबून जून उजाडतो व जांभळे खराब होऊन शेतकऱ्यांना व बागायतदारांना नुकसान सहन करावे लागते. यंदा जांभुळ उत्पादनात बरीचशी घट सहन करावी लागणार असल्याने व साठ ते सत्तर टक्केच उत्पादन हाती लागणार असल्याचे येथील बागायतदार वर्गाने सांगितले.विक्रमगड हा जंगली भाग असल्याने जांभळाचे चांगले उत्पादन आहे परंतु गेल्या दोन चार वर्षांपासून पाहिजे तसे उत्पादन निघत नाही.गावरान जांभूळ झाले दुर्मिळजांभळाचे उत्पादनासाठी पोषक वातारण मिळत नसल्याने गावरान जांभळे यावर्शीही दुर्मिळ झालेला आहे. गेल्या दोन-चार वर्शा पासुन जुनी जांभळाची झाडेही कमी झालेली आहेत. व शील्लक राहीलेली झाडेही फारशी उपयुक्त ठरताना दिसत नाही पुर्वीच्या प्रमाणात झाडांची लागवड आता केली जात नाही. नवीन जातीच्या झाडांना फारशी वाढ नाही त्यामुळे गावरान जांभाळाचा पिहल्या प्रमाणे आस्वाद घेणे दुर्मिळ झालेले आहे.यंदा हवामानातील बदलामुळे आंबा काजु उत्पादना प्रमाणेच जांभळालाही उशिराने मोहर येउन हंगाम उशिराने सुरु झाल्याने जांभळाचे उत्पादन व मिळणारा पैसा येथील बागायदारांना कमी मिळणार आहे.जांभुळ व्यवसाय वातावरणातील होत असलेला सततच्या बदलामुळे फक्त मे मिहन्या व जुनच्या सुरु वातीला चालणार असल्याने शेतक-यांना याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. परंतु सध्या उत्पादीत जांभुळ पिकाला मोठी मागणी असून महाग का होईना ग्राहक त्याची खरेदी करीत आहेत.दोन महिन्यांत मिळते हजारो रु पयांचे उत्पन्नएप्रिल, मे व जून या तीन महिन्यांतच हा व्यवसाय चालत असतो, बागयतदारांना जांभूळ पिकापासून या महिन्यांत ४० ते ५० हजारांचे उत्पन्न मिळते तर आदिवासी खेडया-पाडयांतील जंगल भागातील महिला भरलेल्या जांभळाच्या टोपल्या विकुन याच दोन महिन्यांत १५ ते २० हजार रु पये कमवित असतात.दिवस उगवला की पहाटेच या महिला जांभळे करंडयात (टोपलीत) भरुन विकण्यासाठी मोठया शहरांकडे जात असतात. या हंगामात सध्या बाजारात लहान जांभूळ १२० रु पये किलो तर मोठे जांभूळ १६० रुपये किलो प्रमाणे विकले जात आहे असे विक्र ी करणाºया वनीता दोंडे या जांभूळ विक्रेत्या महिलेने सांगितले.परंतु वातावरणातील बदलांचा परिणाम शेतीव्यवसाया बरोबरच रानमेव्यावरही होतांना दिसत आहे. त्यामुळे जांभळे, करवंदे, काजू, आंबा याची आवक दिवसेंदिवसकमी झाल्याने दुर्मिळ होतांना दिसत आहेत.

टॅग्स :palgharपालघर