शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रकिनारी अवैध रेतीउपसा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 05:23 IST

सागरी किनाऱ्यावर गुन्हे घडू नयेत यासाठी माफियांवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई करावी असे आदेश गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जुलै महिन्यात देऊनही या तालुक्यातील समुद्रकिनारी होणारी खुलेआम अवैध रेतीचोरी रोखण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

बोर्डी : सागरी किनाºयावर गुन्हे घडू नयेत यासाठी माफियांवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई करावी असे आदेश गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जुलै महिन्यात देऊनही या तालुक्यातील समुद्रकिनारी होणारी खुलेआम अवैध रेतीचोरी रोखण्यात पोलिसांना अपयश आले आहे.त्यामुळे मंत्र्यांच्या आदेशाला जुमानले जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. येथील सागरी पर्यटन स्थळांना देश-विदेशातील पर्यटकांकडून विशेष पसंती दिली जात आहे. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पावले उचलण्याचे निर्देश मुंबईत झालेल्या बैठकीत केसरकर यांनी दिले होते. शिवाय सागरी पोलिसांना १२ मैलापर्यंत कारवाई करण्याचे अधिकार असून त्यानुसार बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते. या वेळी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे उपस्थित होते.वर्षभर डहाणू, बोर्डी पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा राबता असतो. मात्र डहाणू या पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने रेती उपसा केला जात आहे. पारनाका, आगर आणि नरपड या गावचे सागरी क्षेत्र डहाणू, चिखले, घोलवड, बोर्डी, झाई हा किनारा घोलवड पोलिसांच्या अखत्यारीत आहे. या ठिकाणी थेट समुद्रात चारचाकी वाहने उतरवून रेती भरून वाहतूक केली जाते. तर बº्याच ठिकाणी पोत्यातून भरलेली रेती मजुरांकडून वाहिली जाते. प्रतिदिन केवळ चार तास काम करून पाचशे ते सहाशे रु पये मिळत असल्याने मजुरही उपलब्ध होत आहेत. त्यामध्ये विद्यार्थी व महिला मजुरांचा खुबीने वापर केला जात आहे. हे थांबविण्याची मागणी होते आहे.असाही विरोधाभासकिनाºयावर मोठे खड्डे पडून विद्रुरूपीकरणासह पर्यटकांना शारीरिक ईजा होण्याची शक्यता आहे. शिवाय रेती माफीयांच्या दहशतीचा सामना स्थानिक नागरिक आणि मच्छिमारांना करावा लागत आहे. एकीकडे सागरी सुरक्षेचे धिंडवडे निघत आहेत. तर सागर सुरक्षा कवच आणि रस्ता सुरक्षा अभियान उत्तम पद्धतीने राबविल्याबद्दल कौतुक होते. हा विरोधाभास थांबला पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे.