लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : भाताणे ग्रांमपंचायतीत मोडणाऱ्या हत्तीखोंडा येथील आदीवासी वस्ती असलेला डोकफोडे पाडा अनेक वर्षे मूलभत सुविधांपासून वंचित आहे. तसेच महानगरपालिका हाकेच्या अंतरावर असतानाही या पाडयातील २५ कुटुंबाना पिण्यासाठी ओढ्याचे पाणी भरावे लागते आहे. येथील तसेच विहिरीचा कडा निकामी झाल्याने पाणी भरणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी ओढ्याच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. तसेच या पाड्यात इंदिरा आवास योजनेतील घरकूले आली असून ती बांधण्यासाठी वेळेवर हप्ते मिळत नसल्याने पावसाला जवळ आला तरी ती अजून अपूर्णच आहेत. पाऊस पडला तर राहायचे कुठे? हा प्रश्न येथील नागरिक प्रशासनाला विचारत आहेत.
डोकफोडेत सुविधांची वानवा
By admin | Updated: May 24, 2017 00:45 IST