शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शाळा डिजिटल, इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 06:35 IST

तालुक्यातील तब्बल ९८ शाळा डीजिटल झाल्या असल्या तरी त्यातील तब्बल २५ शाळांच्या इमारती धोकादायक असल्याचा अहवाल खुद्द शिक्षण खात्यानेच दिला आहे. 

ठळक मुद्दे२५ डिजिटल शाळांच्या इमारती धोकादायक ग्रामपंचायतींकडून तक्रारी होऊनही होते दुर्लक्ष 

शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : तालुक्यातील तब्बल ९८ शाळा डीजिटल झाल्या असल्या तरी त्यातील तब्बल २५ शाळांच्या इमारती धोकादायक असल्याचा अहवाल खुद्द शिक्षण खात्यानेच दिला आहे. शिक्षण विभागाने तालुक्यातील ९८ शाळा डीजिटल केल्या आहेत. एक शाळा डीजिटल करण्यासाठी अडीच ते तीन लाखांचा खर्च येतो. एकीकडे शाळा  डीजिटल केल्या जात असताना त्यांच्या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याने अनेक शाळांच्या इमारतींची पडझड सुरु झाली आहे. आडणे, पाचरुखा, नागले, शिलोत्तर, हेदवडे, खानीवडे, सकवार, केलीचापाडा, शिरसाड, पाणजू (प्राथमिक), चिंचोटी, बोबडपाडा, वाकीपाडा,  टिवरी, कोपरी, गास कोपरी, तुळींज-१, पेल्हार, बरफपाडा, कोलोशी, कुवरपाडा, बेगर्सहोम, हिरा विद्यालय विरार-१, निळेमोरे, आचोळे-२ या शाळा डीजिटल करण्यात आले आहे. डीजिटलमुळे आधुनिक शिक्षण पद्धतीचा वापर सुरु करण्यात आला असून विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होत आहे. या शाळा डीजिटल झाल्या असल्या तरी या शाळांच्या इमारती अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. आडणे शाळाचे छत कोसळून पडले आहे. इतरही शाळांच्या खोल्यांची अवस्था बिकट झाली आहे. तसा अहवाल वसई पंचायत समितीच्या शिक्षण खात्याने पाठवला आहे. डीजिटल झालेल्या तालुक्यातील २५ शाळांच्या ५३ वर्ग खोल्या धोकादायक अवस्थेत असून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज  असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या शाळांची मोठी दुरुस्ती अत्यावश्यक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. शाळा डीजिटल करणे काळाची गरज आहे. मात्र, त्याचबरोबर शाळा इमारतींची देखभाल आणि दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना सध्या धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत धरून शिकावे लागत आहे. एक शाळा डीजिटल करण्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे शाळा डीजिटल करण्याआधी धोकादायक इमारतींची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राम पाटील आणि युवक अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

टॅग्स :Schoolशाळा