शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

खानिवडेत माकडांची दहशत, वनखात्याचे रेस्क्यू आॅपरेशन फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 03:14 IST

पारोळ परिसरातील खानिवडे गावामध्ये माकडांनी उच्छाद मांडला असून त्यांच्या हल्ल्यामध्ये येथील एक महिला जखमी झाली आहे.

सुनील घरत पारोळ : परिसरातील खानिवडे गावामध्ये माकडांनी उच्छाद मांडला असून त्यांच्या हल्ल्यामध्ये येथील एक महिला जखमी झाली आहे. गत काही दिवसात अनेक घरांचे या मर्क टांनी नुकसान केले असून माहगड्या वस्तूंची तोडफोड केली आहे. त्यांना पकडण्यात वनखात्याच्या रेस्क्यू आॅपरेशनला यश न आल्याने गावात दहशतीचे वातावरण आहे.घराच्या छतावरून मोठ्याने उड्या मारणे, विजेचे खांब जोरात हलवून वीज प्रवाह खंडित करणे, घराची कौले उचकून किंवा तोडून घरात प्रवेश करून महागड्या वस्तूंची तोडफोड करून घरात मिळेल ते खाद्य घेऊन पळ काढणे, याला जर विरोध केला तर हल्ला करणे, रस्त्यावरून जाणाºया येणाºया महिलांना व लहान मुलांना ते बेसावध असताना त्यांच्या हातातील वस्तू अचानक पळवणे, त्याला हुसकावल्यास चावा घेऊन जखमी करणे या प्रकारामुळे गावकरी पुरते हैराण झाले आहेत.एकट्या दुकट्यावर अचानक हल्ला करणाºया या माकडांची एवढी दहशत आहे की, घरातून बाहेर पडतांना नागरिक हातात काठ्या व दंडूके घेऊन बाहेर पडत आहेत. माकडाचा बंदोबस्त करावा म्हणून ग्रामपंचायत कार्यालय व सजग नागरिकांनी वनखात्याच्या मार्फत रेस्क्यू टीमच्या मदतीने दोनदा माकडाला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. परंतु चलाख वातात्मजकापुढे वनखात्याला अपयश आले आहे.आता पर्यंत या माकडांनी अनेक घरातील वस्तूंची तोडफोड केली असून रत्नप्रभा घरत या महिलेला चावा घेऊन जखमी केले आहे. तर देवा नामक एका इसमाच्या थोबाडीत मारली आहे. अनेक कुत्र्यांना त्याने चावे घेतले असून कुत्र्यांच्या पिल्लांना जखमी केले आहे. त्याच्या या दहशतीच्या वातावरणामुळे शाळेतील लहानग्यांना मोठ्यांच्या संरक्षणात शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे वन खात्याने लवकरात लवकर या माकडांना जेरबंद करण्याची मागणी रहिवाशी करत आहेत.>मी घरातील सामान घेण्यासाठी बाहेर पडली असताना अचानक माकड समोर येऊन पिशवी खेचू लागले. मी पिशवीची पकड घट्ट करताच माझ्या हाताला त्याने कडकडून चावा काढला व मला जखमी केले.- रत्नप्रभा घरत,गृहिणी (खानिवडे)वनखात्याने पुन्हा एकदा रेस्क्यू करण्याचे ठरवले असून ही माकडे गावातील कोणत्या ठराविक ठिकाणी जास्त वेळ किंवा रात्रीच्या वेळी बसते याचा माग घेणे सुरु आहे. यावेळी जास्त साहित्य व मनुष्यबळाचा वापर करून रेस्क्यू करण्यात येईल.- मनोहर चव्हाण, वनक्षेत्रपाल

टॅग्स :Vasai Virarवसई विरार