शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

बचत गटांना मोबदला मिळेना, सहा महिन्यांपासूनची बिले थकली, तांत्रिक अडचणींचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 05:44 IST

तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करीत महापालिकेने उद्यानांची देखभाल व राखण करणा-या अनेक महिला बचत गटांची सहा महिन्यांपासूनची बिले थकवली आहेत.

- शशी करपे ।वसई : तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करीत महापालिकेने उद्यानांची देखभाल व राखण करणाºया अनेक महिला बचत गटांची सहा महिन्यांपासूनची बिले थकवली आहेत. त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून घरखर्च उचलणाºया असंख्य महिला अडचणीत आल्या आहेत.वसई विरार महापालिका हद्दीतील १३८ उद्यानांची देखभाल व राखण करण्याची कामे नोंदणीकृत महिल बचत गटांना देण्यात आली आहेत. त्यासाठी ३ कोटी ६० लाख २४ हजार ९०० रुपये वार्षिक रक्कमेच्या खर्चास मंजूरी दिली आहे. तसेच वर्षभरात केलेल्या कामातील कुशलता, कार्यक्षमता, सुशोभिकरण आदी बाबींचे निरीक्षण करुन पुढे त्यांना मुदतवाढ आयुक्तांच्या निर्देशानुसार देण्यात येईल, असा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील तीन वर्षांकरता १० कोटी ८० लाख ७४ हजार ७०० इतक्या रकमेला मंजूरी देण्यात आली आहे.महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून शहरातील गरीब, गरजू महिलांना रोजगार मिळावा या हेतून महापालिकेने १३८ उद्यांची देशभाल व राखण करण्याची कामे बचत गटांना दिली आहेत. त्यामुळे शहरातील असंख्य महिलांना आपल्या घराजवळच रोजगार मिळाला आहे. प्रत्येक उद्यानांची क्रमवारी करून त्यानुसार बचत गटांना मोबदला ठरवण्यात आला आहे.मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून अनेक महिला बचत गटांची बिले थकवण्यात आलेली आहेत. त्यामुळे गेली सहा महिने काम करूनही असंख्य महिलांना कष्टाचे पैसे मिळालेले नसल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे.प्रत्येक बचत गट उद्यान देखभालीचे फोटो, रजिस्टर, आवश्यक कागदपत्रे यांची वेळोवेळी पूर्तता करीत असतात. पण, लालफितीच्या कारभारात त्यांची बिले सहा महिन्यांपासून थकली आहेत. उद्यान विभागाकडून लेखा विभागाकडे बिले पाठवली आहेत असे सांगण्यात आले. तर लेखा विभागाने प्रत्येक प्रभाग समितीकडे प्रस्ताव पाठवले असल्याचे सांगत आहेत. बिलांची जबाबदारी ऐकमेकांवर ढकलली जात असल्यानेच महिला बचत गटाचे पैसे रखडल्याची तक्रार शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.दरम्यान, बचत गटांना उद्यानांची कामे दिल्याने संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांची कमाई बंद झाली होती. त्यामुळे या लॉबीने ठेके दिल्यानंतरही पहिले काही महिने अनेक बचत गटांना कागदपत्रांची पूर्तता न केल्याची सबब सांगत बिले थकवण्याची कामे केली होती. तर उद्यानांचा ठेका दिल्यानंतर उद्यानातील सुरक्षा रक्षकही काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे उद्यानात येणाºया समाजकटकांचा त्रास महिला बचत गटातील महिला आणि पर्यटकांना सहन करावा लागत होता.महिलांचे सबलीकरण होणार क से?महापालिकेचे अधिकारी अशा पध्दतीने वागत असतील तर महिलांचे आर्थिक सबलीकरण आणि सक्षमीकरण होईल का ?. महिलांना त्यांचा मेहनताना मिळाला नाही तर त्या उद्यानांची देखभाल प्रामाणिकपणे केली जाईल का ?. जर देखभाली अभावी उद्यानांची दुर्दशा झाली तर याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न चेंदवणकर यांनी उपस्थित केले आहेत.याप्रकरणी जातीने लक्ष घालून बचत गटांचा मेहनताना त्वरीत देण्यात यावा. तसेच भविष्यात मेहनताना वेळच्या वेळी कसा मिळत राहिल याकडे लक्ष घालावे अशी मागणी चेंदवणकर यांनी केली आहे.आता बिले थकवून बचत गटांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रकार सुरु असून पैसेच मिळत नसल्याने नंतर बचत गट ठेका घ्यायला येणार नाही अशी व्यूहरचना महापालिकेतील काही अधिकारी ठेकेदारांच्या इशाºयावरून करीत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात केली जात आहे.