शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

सत्पाळ्यात शेतकऱ्याने केली सिंगापुरी फणसाची लागवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 00:22 IST

ब-याच वर्षापूर्वी सिंगापूरी नारळाची भूरळ वसईतील शेतक-यांना पडली होती. ती नारळाची झाडे आता आपल्या मातीशी एकरूपही झाली आहेत.

वसई : ब-याच वर्षापूर्वी सिंगापूरी नारळाची भूरळ वसईतील शेतक-यांना पडली होती. ती नारळाची झाडे आता आपल्या मातीशी एकरूपही झाली आहेत. वसईत फणसाची शेती होत नसली तरी एका प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क सिंगापूरी फणसाची शेती करण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. सिंगापूरी नारळासोबत आता फणसही सध्या वसईत चर्चेचा विषय बनला आहे. परदेशी फणसाच्या बियांपासून वाढवलेल्या झाडांना फणस लागलेले सध्या वसईत पहायला मिळत आहेत. आणि तो कुतूहलाचा विषय ठरला आहे.मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसईतील ताजी भाजी, फुले, केळी, पपई मुंबईकरांसाठी पहिली पसंत असते. या वसईत भातशेतीही मोठ्या प्रमाणात केली जाते. सोबत आॅर्चिड, हेलिकेनिया फुलांची यशस्वी लागवडही काही शेतकरी करीत आहेत. मोगरा, जाई, जुई आणि पिवळा चाफा या फुलांची शेती मोठ्या प्रमाणात होत असतांना, फळझाडांवर वसईतील शेतकरी विविध प्रयोग करून उत्पादन घेत असतात. वसईच्या सत्पाळे येथील असेच एक प्रयोगशील शेतकरी सुभाष भट्टे यांनी वसईत सिंगापूरी फणसांची झाडे लावून, फणसाचे उत्पन्नही घ्यायला सुरूवात केली आहे. या फणसाचे गरे केशरी रंगाचे आहेत. सामान्य फणसासारखे हे फणस दिसते.>मित्रांनी परदेशवारीनंतर भट्टेंना दिल्या होत्या बियावसई म्हणजे केळीच्या बागा हे समिकरण असताना, वसईत सिंगापूरी फणसाची शेती झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. शेतकरी सुभाष भट्टे यांचे काही मित्र सिंगापूरला गेले होते.विमान प्रवासात फणस खाल्यानंतर त्याच्या बिया भट्टे यांच्या मित्राने कुतूहल म्हणून जपून ठेवल्या. परत आल्यावर त्यांनी त्या बिया रूजवून त्यांची रोपटी भट्टे यांना दिली. भट्टे यांनी या सिंगापूरी फणसाची रोपटी वसईच्या मातीत रूजवून बघण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या घराशेजारील वाडीत याची लागवड केली. ३ वर्षानंतर त्यांच्या या प्रयोगाला यश आले आणि वसईत सिंगापूरी फणस दिसू लागले. या फणसाच्या झाडांना आता १० वर्षे झाली असून वर्षातून २ वेळा या झाडांना फणस येत असल्याचे त्यांनी सांगीतले. आठ ते दहा सिंगापूरी फणसाची झाडे सध्या त्यांच्या वाडीत आहेत. त्यांना २०१५ साली महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषी पुरस्कारही मिळाला आहे. आता या फणसांची लागवड वसईत मोठ्या प्रमाणात होणार आहे.>सिंगापूर, थायलंड, मलेशीया येथील वातावरण हे आपल्या भागातील वातावरणाशी मिळते जुळते असल्यामूळे सिंगापूरी नारळ किंवा फणस आपल्या मातीशी एकरूप होतात. सध्या मी सोनचाफा व जास्वंद याचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतो.- सुभाष भट्टे, प्रगतिशील शेतकरी (वसंतराव नाईक कृषि पुरस्कार विजेते)