शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
5
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
6
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
7
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
8
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
9
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
10
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
11
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
12
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
13
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
14
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
15
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
16
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
17
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
18
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
19
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
20
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू

वसई विरारमधील 145 अधिकृत रिक्षातळांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 12:47 IST

Vasai Virar News: प्रथमच महिला रिक्षा चालकांसाठी विरार व नालासोपारा येथे दोन रिक्षा तळांना मंजुरी; वसई तालुक्यातील ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाच्या मागणीला यश

-आशिष राणे

लोकमत न्यूज नेटवर्क

वसई : वसई विरार शहर महापालिका क्षेत्रामध्ये आजवर रिक्षा उभ्या करण्यासाठी अधिकृतरित्या रिक्षातळ नव्हते. त्यामुळे बऱ्याच कालावधी पासून वसईत अधिकृत रिक्षातळ मंजुर करण्यासाठी ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघ पालघर यांनी सातत्याने आपले प्रयत्न  सुरू ठेवले आणि नुकतेच वसई तालुक्यातील 145 अधिकृत रिक्षा तळाना सर्वेक्षणाअंती मंजुरी देण्यात आली असल्याचे महासंघाचे अध्यक्ष विजय खेतले यांनी लोकमतला सांगितले.

विशेष म्हणजे वसईत पहिल्यांदाच महिला रिक्षा चालकांसाठी देखील विरार व नालासोपारा येथे दोन रिक्षा तळांना मंजुरी देत आरटीओ ने एकारर्थी दिलासा दिला आहे. तत्कालीन वसई आरटीओ अधिकारी अनिल पाटील यांनी तालुक्यातील रिक्षा तळ सर्व्हे करण्याचे आदेश पूर्वीच दिले होते.

त्यानुसार अखेर फेब्रुवारीमध्ये तालुक्यातील 256 रिक्षा तळाचा सर्व्हे करण्यात आला होता व त्यातील 145 रिक्षा तळांना मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या दि.1 जून 2020 रोजी झालेल्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यात प्रथमच महिलांना विरार व नालासोपारा पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर प्रत्येकी पाच रिक्षा अधिकृतपणे उभ्या करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

वसई तालुक्यात अनेक वर्षापासून अधिकृत रिक्षा तळ मंजुर व्हावेत असे विविध रिक्षा संघटना व ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाने मागणी केली होती. तत्कालीन आरटीओ अधिकाऱ्यांनी यासाठी वाहतूक शाखा वसई व  महापालिका यांना पत्र देऊन रिक्षा तळांसाठी सर्व्हे करून अहवाल मागीतला होता. त्यासाठी उप्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे मोटर वाहन निरीक्षक व वाहतुक शाखा वसई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशा दोन्ही पदांची  रिक्षा स्टँड सर्वेक्षण करता नियुक्ती केली होती. 

त्यांच्या सोबत महापालिकेचे अभियंता, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, प्रवासी संघटना आदी या सर्वांनी मिळून फेब्रुवारी 2020 मध्ये वसई तालुक्यातील जवळजवळ 256 रिक्षा स्टँडचा सर्व्हे र्केला. या सर्वेक्षणाचा यापूर्वीच अहवाल मंजुरीसाठी मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण यांच्याकडे पाठवण्यात आला होता  अखेर या अनुषंगाने आशिषकुमार सिंह प्रधान सचिव गृहविभाग (परिवहन) यांच्या अध्यक्षतेखाली दि.19 जून 2020 रोजी मंत्रालयात  झालेल्या बैठकीमध्ये वसई येथिल 145 रिक्षा स्टँडच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. 

या बैठकीला शेखर चन्ने परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मधुकर पांडे-सहपोलीस आयुक्त (वाहतूक) यांच्या सहीत सर्व अधिकरी वर्ग उपस्थित होते. या एकूणच निर्णयामुळे वसईत रिक्षा चालक मालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रात नवनवीन वसाहती वाढल्यामुळे रिक्षा तळांची तेवढीच गरज आहे. ज्या रिक्षातळांना मंजुरी दिली नाही, त्या रिक्षा तळांची जागा पुढेमागे व आजूबाजूला करून व पुन्हा सर्व्हेक्षण करून त्यांना त्याच ठिकाणी अ,ब,क, पद्धतीने मंजुरी द्यावी. तर  वर्षानुवर्षे असलेले रिक्षा तळांना देखील मंजुरी देण्यात आलेली नाही. 

याबाबत पुन्हा विचार करून लवकरच उर्वरित 100 रिक्षा तळांना मंजुरी द्यावी. तसेच महिला रिक्षा चालकांना परिवहन व वाहतुक  विभागाने मंजूर केलेल्या स्वतंत्र रिक्षा तळांमुळे आता महिला व पुरूष रिक्षा चालकांमध्ये होणारा वाद बहुतांश प्रमाणात कमी होईल.

- विजय ग. खेतले

अध्यक्ष , ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक महासंघ

टॅग्स :Vasai Virarवसई विरार