शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये समाजमंदिराचे झाले ज्ञानमंदिर; ‘विद्यार्थीच माझा गुरू’ची राबवली संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 00:55 IST

दुर्गम भागातील कांद्रेभुरे जि.प. शाळेचा उपक्रम

सफाळे : लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने पालघर तालुक्यातील दुर्गम भागात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून समाज मंदिरात विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. जिल्हा परिषद कांद्रेभुरे येथील शिक्षिका जागृती चौधरी यांच्या ‘विद्यार्थीच माझा गुरू’ या शैक्षणिक संकल्पनेतून यश मिळत आहे.

सफाळे पश्चिमेला अतिदुर्गम भागातील कांद्रेभुरे हे गाव डोंगराच्या पायथ्याशी आहे. या विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने धडे घेता येत नसल्याने ते वंचित होते. प्राथमिक शिक्षणाचा पाया ढासळू नये म्हणून हा उपक्र म केला जात असल्याचे जागृती चौधरी यांनी सांगितले. कांद्रेभुरेचे सरपंच जगदीश पाटील यांनी प्रथम आपल्या मुलाला जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका जागृती चौधरी यांच्या मार्गदर्शनासाठी पाठवले. त्यानंतर इतर पालकांनीही इंग्रजी माध्यमातून काढून जिल्हा परिषद शाळेत पाठवायला सुरु वात केली.

आतापर्यंत या शाळेत गावातील इंग्रजी माध्यमातील ८० टक्के मुले दाखल झाली आहेत. त्यांचे मराठी वाचन, लेखन सराव स्वयंसेवक पालक यांच्या मदतीने घेतला जात आहे. या मुलांचे वाचन, लेखन अंतिम टप्प्यात पोहोचलेले आहे. उपक्र मावर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू पाटील यांची मोलाची साथ लाभत आहे. त्यांच्या परवानगीने व आग्रहावरून हा उपक्र म राबवण्यात आला आहे. अशा रीतीने सर्व स्वयंसेवक, पालक, पंचायत समिती सदस्य, सरपंच पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य आणि ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा परिषद कांद्रेभुरे येथे सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून शिक्षणाचा प्रवाह सुरू केला आहे.कोरोनाकाळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता ‘विद्यार्थी माझा गुरू’ ही संकल्पना मला सुचली. मी गावाचे तीन भाग केले. ठरल्याप्रमाणे शाळेतील मुले सर्व नियमांचे पालन करून येत असतात. तसेच स्वयंसेवक चांगला सराव करून घेऊन एक ते दीड तासात शिकवत असतात. हा उपक्र म इयत्ता पहिली, दुसरी आणि तिसरीसाठी आहे. कारण, या विद्यार्थ्यांचा पाया कमजोर राहिला तर शाळा सुरू झाल्यास त्यांचे नुकसान होईल. त्यामुळे शाळा चालू झाल्यावर शाळेतील विद्यार्थ्यांना काही अडचण येणार नाही.- जागृती चौधरी, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद शाळा, कांद्रेभुरेजिल्हा परिषद शाळा, कांद्रेभुरे या शाळेत मुख्याध्यापिका जागृती चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम माझ्या मुलाकडून सुरु वात केली. इतर पालकांनीही इंग्रजी माध्यमातून जिल्हा परिषद शाळेत पाठवायला सुरु वात केली. या शाळेची दखल घेऊन एक वर्षापासून रिक्त असलेली पदे भरून आमच्या शाळेला न्याय द्यावा. -जगदीश पाटील, सरपंच, कांद्रेभुरे

टॅग्स :Educationशिक्षण