शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

निचोळे गावातील पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढले; जल प्रदूषणामुळे झाल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:30 IST

श्री कृष्णा डेरी फार्मच्या प्रदूषित पाण्यामुळे गावातील पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढले

वाडा : या तालुक्यातील निचोळे गावात असलेल्या श्री कृष्णा डेरी फार्मच्या प्रदूषित पाण्यामुळे गावातील पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढले असून ते पिण्यायोग्य नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच तहसीलदार यांना पाठविलेल्या निवेदनात केला असून कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे. मात्र कंपनी व्यवस्थापनाने या आरोपांचे खंडन केले आहे.या कंपनीत दुग्धजन्य पदार्थ पनीर, चीज व योगर्ट याचे उत्पादन केले जाते. पाच वर्षापासून ही कंपनी येथे कार्यरत आहे. कंपनीत पनीर बनविताना केमिकल वापरले जाते. हे केमिकल मिश्रीत पाणी कंपनीच्या एका बाजूला तलाव काढून त्यात सोडले जाते. हे पाणी जमिनीत मुरते. त्यामुळे जल प्रदूषण होत असून गावात सार्वजनिक तसेच खाजगी विहीर आणि कूपनलिकेतील पाणी त्यामुळे दूषित झाले आहे. त्यात क्षारांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. हे पाणी अंगावर घेतल्यास खाज येते ते प्यायल्यास गंभीर स्वरूपाचे आजार होण्याची भीती नागरिकांनी निवेदनात व्यक्त केली आहे.कंपनीजवळ हाकेच्या अंतरावर जिल्हा परिषदेची शाळा आहे. या कंपनीत वीज गेल्यास जनरेटर लावला जातो. त्यामुळे वायू प्रदूषण होत असून ते विद्यार्थांच्या आरोग्यास धोका उत्पन्न करणारे असल्याचे निवेदनात नमूद केले. एकंदरीत कंपनीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ही कंपनी बंद करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे.कंपनीत गावातील सुमारे ५० ते ६० कामगार काम करीत आहेत. जर पाण्यामुळे प्रदूषण झाले असते तर या कामगारांनाही त्रास झाला असता. मात्र गावातील कामगारांना कुठलाही त्रास होत नाही. गावातील राजकीय वाद कंपनीमध्ये आणला जात आहे. तसेच कंपनीमध्ये एटीपी प्लॅन्ट असून कारखान्यातील पाण्यावर प्रक्रि या करून ते पाणी कंपनीतील झाडांना दिले जाते. गेल्या एप्रिल मे महिन्यात या पाण्यावर भेंडी व वांग्याचं भरघोस उत्पन्न काढण्यात आले.- सुरेश पष्टे, व्यवस्थापक, श्री कृष्णा डेरी फार्म

टॅग्स :Waterपाणी