शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

साहिल बेपत्ताच, लालबागच्या राजाच्या विसर्जनात समुद्रात बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 03:46 IST

लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्या दरम्यान गिरगाव चौपाटी समोरील समुद्रात बोटीला झालेल्या अपघातात सोमवारी पाण्यात पडलेल्या घिवली गावातील साहिल जयेश मरदे या ५ वर्षीय मुलाचा दोन दिवस झाले तरी अजून थांगपत्ता लागलेला नाही.

पालघर : लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्या दरम्यान गिरगाव चौपाटी समोरील समुद्रात बोटीला झालेल्या अपघातात सोमवारी पाण्यात पडलेल्या घिवली गावातील साहिल जयेश मरदे या ५ वर्षीय मुलाचा दोन दिवस झाले तरी अजून थांगपत्ता लागलेला नाही. त्याचे संपूर्ण कुटुंब, मच्छिमारांसह त्याचा शोध घेत आहेत. त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने त्याच्या शोध घेण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र पथके नेमावित अशी मागणी घिवली ग्रामस्थामधून केली जात आहे.लालबागच्या राजाच्या दर्शनाची आस गणेशभक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. त्याचे विसर्जन सकाळ पर्यंत सुरू असल्याचे माहीत असल्याने तारापूर जवळील घिवली गावातील जयेश मरदे हे आपली पत्नी नीता, मुलगी त्रिवेणी (१० वर्ष) आणि मुलगा साहिलसह अनंतचतुर्दशीला (रविवारी) कफपरेडला पोचले. सकाळी लवकर उठून साहिल आपले बाबा, आई आणि बहिणीसह आपल्या मामाच्या राजधानी बोटीत जाऊन बसला. ही बोट चौपाटीवर पोचल्यानंतर सुमारे ८.४५ च्या सुमारास लालबागच्या गणपतीचा विसर्जन सोहळा पाहत असताना शेजारच्या बोटीशी टक्कर झाल्याने ही बोट उलटली. त्यामुळे बोटीतील सर्व माणसे पाण्यात बुडाली. याच वेळी नीता हिने प्रसंगावधान राखीत पाण्यात बुडत असलेल्या आपल्या मुलीच्या केसाला पकडून ठेवले. तर आपल्याला बिलगलेल्या साहिल यालाही घट्ट पकडून ठेवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी लोकमतला सांगितले. ही बोट पाण्यात उलटल्यानंतर एकच आरडाओरड होत अनेकांनी मदतीसाठी पाण्यात उड्या घेतल्या. या दरम्यान आपल्या हातातील मुलाला कुणीतरी घेतल्याचे त्याच्या आईचे म्हणणे आहे. मात्र या घटनेला २४ तासाचा अवधी लोटल्या नंतर ही साहिलचा शोध लागला नसल्याने मरदे कुटुंबीय आणि घिवली गावाला दु:खाने ग्रासले आहे. आपल्या मुलाचा शोध घेण्याबाबत पोलीस आणि प्रशासनाकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचे त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे साहिलला कोणी चोरून नेले? की त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला? या बाबत काहीही कळत नसल्याने साहिलच्या आईचे अश्रू अविरत झरत आहे.प्रशासन आणि पोलिसांनी साहिलच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी करून, समुद्रात त्याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तात्काळ उभारायला हवी. आज दोन दिवस झाले तरी त्यांना अजून जाग कशी येत नाही?- नयन तामोरे, ग्रामस्थ, घिवली

टॅग्स :newsबातम्याGanesh Visarjanगणेश विसर्जन