शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

रिक्षावाल्यांनी केली प्रवाशांची लूट

By admin | Updated: March 9, 2017 02:10 IST

मंगळवारी संध्याकाळी मालगाडी घसरल्याने बंद पडलेली पश्चिम रेल्वेची वाहतूक कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने तब्बल १५ तासा नंतर पूर्ववत सुरु करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले

पालघर : मंगळवारी संध्याकाळी मालगाडी घसरल्याने बंद पडलेली पश्चिम रेल्वेची वाहतूक कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने तब्बल १५ तासा नंतर पूर्ववत सुरु करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. या घटनेत प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना खाजगी वाहतूकदारांनी अनेक प्रवाशांची लूट केली.काल संध्याकाळी ५ वाजून ५८ मिनिटांनी मुंबईकडे जाणारी मालगाडी घसरल्या नंतर अप व डाऊन ट्रॅक बंद पडले होते, मात्र स्थानिक प्रशासनाने तीन तासा नंतर डाऊन लाईन सुरु करु न मुंबईहुन गुजरात व दिल्लीकडे जाणाऱ्या राजधानीसह एक्स्प्रेस गाड्याना प्राधान्य दिल्याने दैनंदिन प्रवासी संतप्त झाले होते. वलसाड पॅसेंजर सह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.सफाळे येथील रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी वापी येथून काल ८ वाजता पहिली क्रेन आली. आणि युद्धपातळीवर काम सुरु ठेऊन रेल्वे प्रशासनाने ९ वाजेपर्यंत काम सुरु केले व पहिली जम्मूतावी बांद्रा गाडी सफाळे स्थानकातून ९:१५ वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाली. ट्रेन्स अनिश्चित धावत असल्याने स्थानकात अडकून पडलेल्या प्रवाशांना माणुसकीच्या भावनेने मदत करण्याचे काम सर्वच स्थानकात चालू असतांना पालघर-बोईसर मधील रिक्षाधारकांनी मात्र दुप्पट-तिप्पट भाडेवाढ करून प्रवाशाना लुटण्याचे काम केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दोन्ही बाजू कडील रेल्वे सेवा ठप्प पडल्या नंतर डहाणू आणि विरारकडे जाणारा हजारो प्रवाशांचा लोंढा विविध स्थानकावर अडकून पडला होता. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी तात्काळ विविध विभागांना आपल्या सेवा पुरविण्याच्या सूचना केल्या. एसटी महामंडळाच्या पालघर विभागाने डहाणू, विरार, सफाळे, बोईसर इ. भागातील प्रवाश्यांसाठी ५० बसेसची व्यवस्था करून प्रवाशांना दिलासा दिला.पालघर विभाग नियंत्रक अजित गायकवाड, डेपो मॅनजर व्ही एस भंडारे यांनी योग्य नियंत्रण केले. तर दुसरीकडे पालघर ते बोईसर दरम्यानच्या सहाआसनी रिक्षाचे भाडे दर माणसी १५ रुपये असताना ५० रुपये घेऊन लूट केली. स्थानकांवर संघटनांनी प्रवाशाना पाणी, जेवण, नाश्ता इ. सेवा पुरविल्या.