शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एका रात्रीत बांधला रस्ता, आचारसंहितेचे काय? :

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 03:48 IST

पालघरच्या पाटकर गल्लीतील (रामकृष्ण नगर) मागील दीड मिहन्यांपासून रखडलेला रस्ता एका रात्रीत उभारण्याची किमया सेनेच्या एका वरिष्ठ नेत्यांने युद्धपातळीवर केल्याने तेथील रहिवाश्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

- हितेन नाईकपालघर  - पालघरच्या पाटकर गल्लीतील (रामकृष्ण नगर) मागील दीड मिहन्यांपासून रखडलेला रस्ता एका रात्रीत उभारण्याची किमया सेनेच्या एका वरिष्ठ नेत्यांने युद्धपातळीवर केल्याने तेथील रहिवाश्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.पालघर पाटकर गल्ली ते भाजी मार्केट रस्त्याचा ठेका १८ लाखाला देण्यात आला असून नगरपरिषदेकडून नळाच्या पाईपलाईनचे काम करण्यात येत नसल्यामुळे मागील दीडमहिन्यांपासून या रस्त्याचे काम अपूर्णवस्थेत पडून होते. या बाबत रामकृष्णनगर मधील रहिवाशांनी नगरपरिषदेकडे अनेक तक्र ारी केल्या होत्या. या बाबत रहिवाशांनी ठेकेदाराकडे विचारणा केली असता नगरपरिषदेकडून पाईपलाईनचे काम हाती घेतले जात नसल्याने रस्त्याचे काम सुरू करता येत नसल्याचे ठेकेदाराने त्यांना सांगितले. नगरपरिषद आणि ठेकेदारच्या वादामुळे या भागातील रस्ते खोडून दगड, खडी, सीमेंट कोंक्र ीटचे ढीग पडून गटाराचे सांड पाणी साचले आहे. सदर रस्त्याच्या कामाचा ठेका एका बंडखोर शिवसेना अपक्ष उमेदवाराशी संबंधित असल्याचे कळल्यानंतर सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने तत्काळ रामकृष्णनगर मधील नागरिकाशी संपर्क साधला. नगरपरिषद प्रशासनाला रात्रीच घटनास्थळी बोलावून त्यांनी संबंधित ठेकेदार काम पूर्ण करीत नसल्यास त्याच्यावर कारवाईचे आदेश दिले. ठेकेदाराने घटनास्थळी येत नळ पाणीपुरवठ्याचे काम अपूर्ण असल्याने रस्त्याचे काम हाती घेता येत नसल्याचे सांगितले. त्यावर सेना नेत्याने कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.शिवसेनेची पंधरा वर्ष सत्ता असलेल्या पालघर नगरपरिषदेत अनेक विकास कामे आजही अपूर्णावस्थेत्त पडून असून त्याच्याकडे मात्र अद्यापही लक्ष दिले गेलेले नाही. बाळासाहेबांच्या नावाने उभारण्यात आलेल्या उद्यानाची हजारो रु पयांचे विद्युत वितरण विभागाचे बील वेळीच भरण्यात आलेले नसल्याने हे उद्यान अनेक महीने अंधारात होते.इतर कामांचे काय?मतांचे गणित डोळ्यांसमोर ठेवून हे काम तात्काळ करण्यात आले असले तरी अशी सजगता शहरातील अन्य अपूर्ण कामे पूर्ण करण्याकरिता का दाखवली गेली नाही असा सवाल आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार