शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा २६/११ च्या पुनरावृत्तीचा धोका; समुद्रात नोंदणीविना हजारो बोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 14:16 IST

समुद्रात नोंदणीविना हजारो बोटी, नियंत्रण परप्रांतीयांच्या हाती?

हितेन नाईक

पालघर : वसई तालुक्यातील अर्नाळा बंदर हद्दीतील विनानोंदणी दोन बोटींवर महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून नुकतीच कारवाई केली गेली. त्यात त्या नष्ट करण्यात आल्या. वसई, पालघर तालुक्यात एक ते दीड हजार रेती उत्खनन करणाऱ्या बोटींपैकी अनेक बोटी नाव, नंबर, नोंदणी न करता आजही समुद्रात जात असल्याने याचा देशविघातक कामांसाठी वापर होण्याची शक्यता पाहता सागरी मंडळाने ही मोहीम अधिक तीव्र करून २६/११ सारख्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक पावले उचलायला हवीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे, तर समुद्रातील या विनानोंदणीच्या हजारो बोटींचे नियंत्रण परप्रांतीयांच्या हाती असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. वसई तालुक्यातील खानिवडे आणि खाडी किनाऱ्यावर बेकायदेशीररीत्या रेती उत्खनन करणाऱ्या २३० बोटींवर तत्कालीन पालघर पोलिस अधीक्षकांनी कारवाई केली होती. यातील एकाही बोटीवर नाव आणि नंबर नसल्याने या बोटींचा देशविरोधी कामासाठी वापर होण्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर अशा नाव, नंबर नसलेल्या बोटींवर मरीन ॲक्टनुसार कारवाई करावी, यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयाने सागरी महामंडळाकडे पत्रव्यवहारही केला होता. 

बोटींची नोंदणी करा, अन्यथा कारवाईयावेळी सर्व बोट मालकांना सागरी मंडळातर्फे आवाहन करताना आपल्या विनानोंदणी बोटी या नोंदणी करण्यात याव्यात, अन्यथा त्या बोटी नष्ट किंवा जप्त करून लिलाव करण्यात येईल, असा इशारा यावेळी कॅप्टन लेपाडे यांनी दिला.

तपासणीसाठी पोहोचले अधिकारी वैतरणा खाडीत कामगारांच्या बोटीला झालेल्या अपघातामुळे शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली.  त्यावेळी कामगारांना घेऊन जाणाऱ्या बोटीची नोंदणी, चालक प्रशिक्षण पुरावे आदी तपासणीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे कॅप्टन लेपाडे, बंदर निरीक्षक नवनीत निजाई, सहायक निरीक्षक प्रसाद पारकर यांना पाचारण करण्यात आले होते.  यांनी वसईतून घटनास्थळी येताना अर्नाळा बंदर हद्दीत रेती उत्खनन करणाऱ्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या विनानोंदणी दोन बोटी जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे नष्ट केल्या.

 चोरट्या पद्धतीने रेती उत्खनन

वसई तालुक्यातील खानिवडे, नारिंगी तर पालघर तालुक्यातील बहाडोली, चहाडे, मुरबे, वाढीव, तांदूळ वाडी, पारगाव, सोनावे, दहिवाले, नवघर, घाटीम आदी भागांत मोठ्या प्रमाणात चोरट्या पद्धतीने रेती उत्खनन केले जात आहे. यासाठी सुमारे एक ते दीड हजार बोटींचा वापर केला जात असून, या बोटींची नोंद मात्र महाराष्ट्र सागरी महामंडळाकडे केली जात नसल्याचे दिसून आले आहे. 

टॅग्स :Mumbaiमुंबई26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाpalgharपालघर