शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवारी रिक्षाचालकांचा आरटीओवर मूक मोर्चा

By admin | Updated: January 30, 2017 01:29 IST

केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ च्या नियमातील शुल्कात केलेल्या भरमसाठ वाढीविरोधात वसईतील रिक्षा संघटना विरार येथील उपप्रादेशिक कार्यालयावर मंगळवारी मूक मोर्चा नेणार आहेत.

वसई : केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ च्या नियमातील शुल्कात केलेल्या भरमसाठ वाढीविरोधात वसईतील रिक्षा संघटना विरार येथील उपप्रादेशिक कार्यालयावर मंगळवारी मूक मोर्चा नेणार आहेत. केंद्र सरकारच्या भूपृष्ठ व दळणवळण मंत्रालयाने केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ च्या नियमातील शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे. यासंदर्भात या मंत्रालयाने २९/१२/२०१६ रोजी अधिसूचना काढून त्याची पूर्वलक्षी अंमलबजावणी करण्याचे आदेश काढले आहेत. केंद्र सरकारने अनुज्ञप्ती, व्यवसाय प्रमाणपत्र, वाहन नोंदणी, बोजा चढविणे या विविध विषयांच्या कामकाज शुल्कात १० ते १५ पटीने वाढ केली आहे. या भरमसाठी शुल्क वाढीमुळे रिक्षा, टॅक्सी, बस, खाजगी वाहने, अपंगांची वाहने यांना मोठा फटका बसणार आहे. या भरमसाठ शुल्क वाढीच्या विरोधात देशासह महाराष्ट्रात वाहतूक संघटनांमध्ये असंतोष खदखदत आहे. केंद्राची ही अधिसूचना तत्काळ रद्द करावी यासाठी ३१ जानेवारीला महाराष्ट्रभर आॅटो रिक्षा चालक-मालक संघटना राज्य कृती समितीतर्फे चक्का जाम करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वसई तालुक्यातील सर्व संघटना मिळून ३१ जानेवारीला उपप्रादेशिक कार्यालयावर मूक मोर्चा नेऊन शुल्क वाढीचा निषेध करून ही अधिसूचना रद्द करण्याची मागणी करणार आहे. आज वसई पश्चिम विश्वकर्मा हॉल येथे तालुक्यातील रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात मोर्चा नेण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थान शिवराज मुमाणे होते. विजय खेतले, जयकर तिवारी, मधुसूदन राणे, दयाशंकर गोंड, बाबूलाल राजभर, स्वप्निल नर, अरविंद पाटील, रघुनाथ कळभाटे, महेश कदम, रफिक शेख, रिझवान शेख, गोपाळ कांदळगांवकर, बब्बू मिश्रा, नरेंद्र कौर, नसीम खान, हरिश यादव, अशोक मिश्रा, सुधाकर इंगळे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.