शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती, पूरबाधितांच्या पंचनाम्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 01:31 IST

अनेक वर्षे वाडा तालुका विकासापासून वंचित असून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाड्याच्या विकासाबाबत अधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांना केली होती.

वाडा : अनेक वर्षे वाडा तालुका विकासापासून वंचित असून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाड्याच्या विकासाबाबत अधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांना केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिका-यांनी तालुक्यासंदर्भातील सर्व अधिका-यांची बैठक घेऊन अधिका-यांना तालुक्याच्या विकासासंदर्भात सूचना करत कर्मचा-यांची झाडाझडती घेतली.वाडा पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच या अतिवृष्टीमुळे ज्या शाळांचे तसेच प्राथमिक आरोग्य विभागाचे नुकसान झाले आहे त्यांचे देखील तत्काळ पंचनामे करून आहवाल बनविण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. तालुक्यातील अतिवृष्टीमुळे विहिरींमधे गाळ गेल्याने पाणी अशुद्ध झाले आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. यासाठी तत्काळ विहिरींमधील पाणी काढून त्या साफ करण्याच्या सूचना यावेळी डॉ. कैलास शिंदे यांनी केल्या. पाण्याने जर रोगराई उद्भवल्यास तालुका आरोग्य अधिकारी आणि पाणीपुरवठा विभाग जबाबदार राहील असे ठणकावले.यावेळी ज्योती ठाकरे यांनी वाड्यातील रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयलयाचा दर्जा मिळावे, अशी मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाºयांनी उपस्थित अधिकाºयांना या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा म्हणून सूचना करत अधिकाºयांनी नुसत्या अर्जविनवण्या न करता त्या गोष्टींचा पाठपुरावा करण्याचा सल्ला दिला. वाडा कोलम या तांदळाला (जी.आय.) मानांकन मिळावे यासाठी तालुका कृषी कार्यालयातून कोणते प्रयत्न केले. यासंदर्भात कृषी अधिका-यांना प्रश्न विचारात त्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच वाडा कोलम वाचविण्यासाठी गट शेतीला प्राधान्य देण्याची सूचनाही केल्या.या वेळी आ. शांताराम मोरे, पालघर उपजिल्हाध्यक्ष निलेश गंधे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती धनश्री चौधरी, पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके, नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, आदी उपस्थित होते.प्लास्टिकचा वापरबंद करण्याचे आदेशयाच बरोबर ग्रामपंचायतींचा आॅनलाईन सुविधांचा बोजवारा उडाला असून ही सुविधा तत्काळ सुरू करण्याच्या सूचना गटविकास अधिकाºयांना करण्यात आली. वाडा शहरातील रस्त्याबाबत बांधकाम विभाग आणि नगरपंचायतीने संयुक्त कारवाई करावी करण्याचा सल्ला यावेळी केला. वाडा डंम्पिंग ग्राउंड प्रश्न उपस्थित करत त्यांनी घनकचºयावर तातडीने काम करण्याची गरज असून प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार