दिपक मोहिते, वसईनालासोपारा हे गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध म्हणून ओळखले जाते. हत्या, बलात्कार, दरोडे व अन्य घटनांमध्ये गेल्या २ महिन्यात प्रचंड वाढ झाली आहे. अतिरीक्त पोलीस ठाणी निर्माण होऊनही गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे पोलीसांना शक्य झाले नाही. अनधिकृत बांधकामांमध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा राबता हा या शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम करणारा आहे. त्यामुळे पोलीसांनी सलग ८ दिवस कोंबींग आॅपरेशन हाती घेऊन कारवाई केली तरच गुन्हेगारीचा आलेख खाली येईल असे नागरीकांचे म्हणणे आहे.काही महिन्यापासून शहरात गुन्ह्णामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अनधिकृत बांधकामांमध्ये स्वस्त खोल्या मिळत असल्यामुळे अन्य गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती येथे स्थायीक झाले असून ही मंडळी अनेक गैरकृत्यामध्ये सहभागी असतात. ३ महिन्यापासून हत्या व बलात्काराच्या घटनांमध्ये सतत वाढ झाली आहे. शहरातील संतोषभुवन, अलकापुरी, धानीवबाग या भागात शहराबाहेरील गुंडांचा मुक्त वावर आहे. पूर्वी महिन्यातून किमान २ ते ३ दिवस कोंबींग आॅपरेशन होत असे. हे कोंबींग आॅपरेशन बंद झाल्यामुळे गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
कोंबींग आॅपरेशन पुन्हा सुरू करावे
By admin | Updated: September 23, 2015 23:51 IST