शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बस दुरुस्ती खर्च ७५ टक्के वाढला, सेवेमध्ये केवळ ३० बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 06:15 IST

भार्इंदर परिवहनची वस्तुस्थिती : प्रशासन, सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण नाही, सेवेमध्ये केवळ ३० बस

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१५ ते २०१८ दरम्यान दाखल केलेल्या ५३ साध्या बसच्या दुरुस्तीपोटी तीन वर्षांतील खर्च सुमारे ७५ टक्कयांनी वाढला आहे. इतका खर्च करूनही दिवसाला केवळ २८ ते ३० बसच सेवेत असून उर्वरित दुरुस्तीअभावी उभ्या आहेत.स्थानिक परिवहन विभागाने पाच वातानुकूलित बसच्या दुरुस्तीसाठी तब्बल दोन कोटी ८० लाखांची उधळपट्टी केल्याचे समोर आल्यानंतर ५३ साध्या बसच्या दुरुस्तीवरील उधळपट्टी चव्हाट्यावर आली आहे.

गेल्या वर्षी महापौर डिम्पल मेहता यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत ही सेवा एनसीसी विथ व्हाएबल गॅप फंडिंग या संकल्पनेवर चालवण्यास मान्यता दिली. यात कंत्राटदाराला होणाºया नुकसानीची भरपाई पालिकेकडून केली जाणार आहे. दीड वर्षापूर्वी पालिकेने हीच सेवा जीसीसी संकल्पनेवर चालवण्याची कार्यवाही सुरू केली होती. त्याला बासनात गुंडाळून नवीन संकल्पनेवरील सेवेला मान्यता दिल्यानंतरही ती अद्याप सुरू झालेली नाही. मात्र, त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.सध्या केवळ मनुष्यबळ पुरवठ्याच्या कंत्राटावर ही सेवा सुरू असून त्यातच या सेवेला आगारासह तज्ज्ञांची व्यवस्था नसल्याने बस खाजगी कंपन्यांकडे दुरुस्तीसाठी पाठवल्या जातात. २०१५-१६ मध्ये पालिकेने २५ बस खरेदी केल्या. २०१६-१७ मध्ये १७ नवीन बस, तर २०१७-१८ मध्ये ही संख्या ५३ पर्यंत गेली.

पालिकेने सुरुवातीला २५ बसच्या दुरुस्तीसाठी सुमारे दोन लाख ५० हजार इतका निधी खर्च केला. २०१६-१७ मध्ये ४२ बसच्या दुरुस्तीचा खर्च तब्बल ७६ लाखांवर गेला. यानंतर, २०१७-१८ या वर्षात ५३ बसच्या दुरुस्तीच्या खर्चाने, तर सुमारे एक कोटी ८५ लाखांची मर्यादा ओलांडली. मागील तीन वर्षांत एकूण ५३ बसच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी ६५ लाखांच्या निधीची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. ही सेवा सुरळीत चालावी, यासाठी पालिकेने केलेल्या खर्चाच्या उधळपट्टीतूनही केवळ २८ ते ३० बसच प्रवाशांना सेवा देत आहेत. तर, उर्वरित बस धूळखात आहेत. बसच्या दुरुस्ती खर्चात तीन वर्षांत झालेली सुमारे ७५ टक्कयांची वाढ कुणासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.प्रवाशांच्या थंडगार प्रवासाकरिता २०१६ मध्ये खरेदी केलेल्या पाच वातानुकूलित बसपैकी दोन बस नादुरुस्त झाल्या आहेत.नागरिकांच्या पैशावर डल्ला मारणार का?दोन वर्षांत या बसच्या दुरुस्तीसाठी तब्बल दोन कोटी ८० हजारांची उधळपट्टी झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने यापूर्वी प्रसिद्ध केले होते. त्याच्या चौकशीसाठी प्रशासनासह सत्ताधारी व विरोधी पक्षांनी अद्याप कोणतीही हालचाल केली नसल्याने नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारणार का, असा संतप्त प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होऊ लागला आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारBus Driverबसचालक