शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मिठागर वस्तीची व्यथा सुरेश प्रभूंच्या दालनात, नवघरवासीयांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 02:25 IST

वसई नवघर पूर्वेला मिठागर वस्तीत पाणी साचते व त्यामुळे येथील कुटूंबांचा संपर्क तुटतो. दरवर्षी पावसाळ्यात महापालिका प्रशासन त्यांना मदत करत असते.

वसई - वसई नवघर पूर्वेला मिठागर वस्तीत पाणी साचते व त्यामुळे येथील कुटूंबांचा संपर्क तुटतो. दरवर्षी पावसाळ्यात महापालिका प्रशासन त्यांना मदत करत असते. मात्र, ही सॉल्ट विभागाची जागा असल्याने या ठिकाणी रस्ते व इतर कामे करण्याच्या अडचणी निर्माण होतात. यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी महापौर रुपेश जाधव व माजी महापौर नारायण मानकर यांनी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली.या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचल्याने वसई विरार महानगरपालिकेच्या आपत्कालिन यंत्रणेला रेस्क्यू करु न कुटूंबाना अन्यत्र स्थलांतरीत करण्याची वेळ येत असते. तसेच मालमत्तेच नुकसान होते. गरोदर महिला, लहान मुले, अपंग , जेष्ठ नागरिक आदींना त्यामुळे त्रास सहन करावा लागतो. पूरजन्य परिस्थीती नंतरही संसाराची घडी बसविण्यासाठी वेळ लागतो. ही वस्ती सुविधांपासून वंचीत आहे. यासाठी महापौर रु पेश जाधव व व माजी महापौर नारायण मानकर यांनी अवजड उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांची दिल्ली येथे भेट घेतली व त्यांना वसई नवघर पूर्वेकडिल मिठागर वस्ती विकासात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विनंती केली. तर पाणजू व भार्इंदर हा १३२५ कोटींचा ब्रिज होणार असला तरी सॉल्ट विभागाच्या जमिनी बाधीत होणार आहेत. याबाबत विभागाने विचार करावा असे निवेदन देण्यात आले.केंद्रीय मंत्र्यांचे आश्वासनवरील सॉल्टच्या जमिनीचा प्रस्ताव मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने सॉल्ट विभागाला दिल्ली येथे पाठविला आहे.त्याचा अभ्यास करु न त्वरीत परवानगी द्यावी असे संबंधीत अधिकाºयांना आदेशीत केले व यापुढेही सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार