शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

नातेवाइकांनाही व्हावे लागणार मनोरुग्णांसोबत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 06:44 IST

नवीन तीव्र मानसिक आजार आढळलेल्या तसेच शॉर्ट टर्म उपचार करून बरे होणाऱ्या रुग्णांना आता त्यांच्या नातेवाइकांसह मनोरुग्णालयात दाखल करून घेतले जाणार आहे.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : नवीन तीव्र मानसिक आजार आढळलेल्या तसेच शॉर्ट टर्म उपचार करून बरे होणाऱ्या रुग्णांना आता त्यांच्या नातेवाइकांसह मनोरुग्णालयात दाखल करून घेतले जाणार आहे. २ आॅक्टोबरपासून ही कार्यपद्धती ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात लागू होणार असल्याची माहिती मनोरुग्णालय प्रशासनाने दिली. मात्र, या निर्णयास किती मनोरुग्णांचे नातेवाईक प्रतिसाद देतील, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.मेंटल हेल्थ अ‍ॅक्टमधील व्हॉलेंटरी बोर्ड अ‍ॅडमिशनअंतर्गत ही कार्यपद्धती सुरू होणार आहे. मनोरुग्णास दाखल करून गेल्यावर अनेकदा त्यांचे नातेवाईक त्यांना भेटायला येत नाही किंवा घेऊनही जात नाहीत, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, या निर्णयाला नातेवाइकांचा विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे हा नियम ओळखीच्या मनोरुग्णांसाठी म्हणजेच ज्यांना स्वत:हून मानसिक आजार बरा करण्यासाठी दाखल व्हायचे आहे, अशांसाठी लागू करण्यात येणार आहे. याआधी ओळखीच्या आणि अनोळखी मनोरुग्णांना कोर्टाच्या कायदेशीर कार्यवाहीनुसार दाखल करून घेतले जात होते. आता ओळखीच्या मनोरुग्णांची कोर्टाच्या कायदेशीर कार्यवाहीच्या माध्यमातून सुटका केली जाणार असून त्यांना व्हॉलेंटरी बोर्ड अ‍ॅडमिशननुसार दाखल करून घेतले जाणार आहे. कोर्टाची कायदेशीर प्रक्रिया ही नातेवाइकांना मानसिक त्रास देणारी, लांबलचक, किचकट आहे. यात मनोरुग्णाला दाखल करून घेण्यासाठी कमीतकमी पाच ते जास्तीतजास्त २४ तास लागतात. त्यामुळे व्हॉलेंटरी बोर्ड अ‍ॅडमिशननुसार होणारे अ‍ॅडमिशन नातेवाइकांसाठी सोयीस्कर ठरेल, असे अधीक्षक डॉ. संजय बोदाडे यांनी सांगितले.२४ तासांची सक्ती नाहीमनोरुग्णांसोबत नातेवाईक २४ तास राहिलेच पाहिजे, अशी सक्ती नसेल. रात्रीच्या वेळी ते आपल्या रुग्णाकडे येऊ शकतात, असे अधिक्षक बोदाडे यांनी सांगितले. मनोरुग्णांना दाखल केल्यानंतर नातेवाईक दुसºया दिवशी न येण्याची भीती असल्याने ही अट घालणार आहे.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या