शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

भरपाई नंतरच ताब्यात घेतले नातेवाईकांनी पार्थिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:09 IST

तालुक्यातील तोरणे या गावाच्या हद्दीत असलेल्या तोरणे इस्पात या कंपनीत बुधवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास भट्टीमध्ये

वाडा : तालुक्यातील तोरणे या गावाच्या हद्दीत असलेल्या तोरणे इस्पात या कंपनीत बुधवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास भट्टीमध्ये स्फोट होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला होता.या कामगारांच्या नातेवाईकांनी नुकसान भरपाई मिळेपर्यंत त्यांच्यावर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतल्याने कंपनी प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.अखेर आज दुपारनंतर नुकसान भरपाई देण्याचे मान्य केल्यानंतर नातेवाईकांनी शव ताब्यात घेतले दरम्यान, आज दुपारी कंपनी संचालकालाही नातेवाईकांनी काही काळ घेराव घातला होता. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले.तोरणे इस्पात या कंपनीत गेल्या बुधवारी संध्याकाळच्या सुमारास भट्टीमध्ये स्फोट झाला होता. त्यात भट्टी शेजारी काम करणारे निलेश यादव, संजय गुप्ता, सनी वर्मा व विनोद यादव यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचे पार्थिव वाडा शवागारात ठेवण्यात आली. मृतांच्या नातेवाईकांनी योग्य ती भरपाई मिळेपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतल्याने अखेर कुणबी सेनेचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर वेखंडे यांनी संचालकांशी चर्चा करून मृतांच्या नातेवाईकांना तत्काळ दोन लाख रुपये व अंत्यसंस्काराचा खर्च तसेच जखमी कामगार विकास सिंग याचा उपचारासाठी येणारा खर्च कंपनीचे संचालक मकसुद खान यांनी देण्याचे मान्य करुन त्याचा धनादेश तत्काळ दिले. यानंतर नातेवाईकांनी शव आपल्या ताब्यात घेऊन ते उत्तर प्रदेशातील गावी रवाना झाले.