शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

फिटनेस नूतनीकरण शुल्कात कपात

By admin | Updated: September 29, 2016 03:31 IST

उशिरा योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी (फिटनेस) सहमत शुल्क आकारण्यासाठी प्रतिदिन असणारा दंड कमी करण्यात आला असून तो आता विलंबाच्या प्रत्येक १५ दिवसांसाठी

वसई : उशिरा योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी (फिटनेस) सहमत शुल्क आकारण्यासाठी प्रतिदिन असणारा दंड कमी करण्यात आला असून तो आता विलंबाच्या प्रत्येक १५ दिवसांसाठी किंंवा त्याच्या भागासाठी आॅटोरिक्षा, टॅक्सीसाठी रूपये १००/- व इतर वाहनांसाठी रू.२००/- आकारण्याचे आदेश पारित केले आहेत. द्वत्यामुळे आॅटोरिक्षा, टॅक्सी द्यआणि ट्रकचालकांना दिलासा मिळाला आहे. परिवहन विभागाने ३ ते ४ वर्षांपासून परिवहन संवर्गातील वाहनांच्या नूतनीकरणासाठी राज्यात विविध परिवहन विभागांत उशिरा योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाबाबत वेगवेगळे दर निश्चित केले होते. राज्यातील विविध भागांत यामध्ये असमानता होती. आॅटोरिक्षा, टॅक्सी पासिंंगकरिता प्रतिदिन १०० रू. आकारण्यात येत होते. त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट वाहने पासिंंग करण्याकरिता २०० ते ५०० रू. प्रतिदिन आकारण्यात येत होते. यासंदर्भात मागील ४ वर्षांपासून आॅटोरिक्षा टॅक्सीचालक-मालक महासंघातर्फे शासनस्तरावर आंदोलने, निवेदने व चर्चेद्वारे तोडगा काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू होते. त्याचबरोबर या दरआकारणीमध्ये असमानता असल्याचे शासनाच्या निदर्शनासदेखील आणून दिले होते. मागील ४ वर्षे सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाने उशिरा योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी (फिटनेस) सहमत शुल्क आकारण्यासाठी प्रतिदिन असणारा दंड कमी केला असून तो आता विलंबाच्या प्रत्येक १५ दिवसांसाठी किंंवा त्याच्या भागासाठी आॅटोरिक्षा, टॅक्सीसाठी रूपये १००/- व इतर वाहनांसाठी रू.२००/- आकारण्याचे आदेश पारित केले आहेत. या निर्णयाचे आॅटोरिक्षा टॅक्सीचालक-मालक महासंघाचे अध्यक्ष विजय खेतले यांनी स्वागत केले आहेत. अनेकांच्या रोजीराटीशी संबधित हा निर्णय असल्याने त्याचे जिल्हाभरात स्वागत होत आहे.कलम ८६ (५) अन्वये सम शुल्क मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ५६ नुसार परिवहन संवर्गातील वाहनांसाठी योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार परिवहन संवर्गातील वाहनांना योग्यता प्रमाणपत्र मिळाले नसल्यास सदर वाहन वैधरीतीने नोंदवले असल्याचे मानले जात नाही. तथापि, अशा परिवहन संवर्गातील वाहनांना उशिरा योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी वेगवेगळ्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांनी वेगवेगळे सहमत शुल्क निश्चित केले होते. तसेच उशिरा योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या सहमत शुल्काच्या रकमेत मोठ्या प्रमाणात तफावत होती. एकसूत्रता असावी, त्यादृष्टीने योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास परवाना निलंबनास अथवा रद्द होण्यास पात्र ठरतो. तथापि, अशा प्रकरणात परवाना निलंबित किंंवा रद्द न करता मोटार वाहन कायद्यातील कलम ८६ (५) अन्वये सम शुल्क आकारण्यात येणार आहे.गेल्या चार वर्षांपासून रिक्षाचालक हवालदिलमागील ४ वर्षांपासून प्रतिदिन आकारण्यात येणाऱ्या शुल्कामुळे रिक्षाचालक व अन्य वाहनचालक हवालदिल झाले होते. प्रतिदिन १०० रूपये आकारण्यात आल्यामुळे रिक्षा व टॅक्सीचालकांचे कंबरडे मोडले होते. यामुळे अनेक रिक्षा पासिंंग न होता रस्त्यावर धावत होत्या. तसेच इतर वाहनेदेखील पासिंंग न करता रस्त्यावर धावल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. याचा फटका शासनाच्या महसुलावरही बसला होता. रिक्षा पासिंंग न झाल्याने रिक्षा परवानेही नूतनीकरण करता येत नव्हते. प्रतिदिन आकारण्यात येणारा १०० रू. दंड कमी करावा, यासाठी मागील ४ वर्षांच्या प्रयत्नांना यश आले असून यामुळे तालुक्यातील १५ हजार रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे महासंघाचे अध्यक्ष विजय खेतले यांनी सांगितले.