शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

वाडा तालुक्यातील गातेसमध्ये झेंडूचे विक्रमी पीक

By admin | Updated: March 5, 2017 02:26 IST

तालुक्यातील फूलशेतीचे उत्पादन जास्त होत नाही. मात्र, येथील ग्रामस्थ गेल्या काही वर्षापासून झेंडूचे विक्रमी उत्पादन घेऊन त्याची शेती यशस्वी केली आहे. भातशेतीची कापण

- वसंत भोईर,  वाडातालुक्यातील फूलशेतीचे उत्पादन जास्त होत नाही. मात्र, येथील ग्रामस्थ गेल्या काही वर्षापासून झेंडूचे विक्रमी उत्पादन घेऊन त्याची शेती यशस्वी केली आहे. भातशेतीची कापण झाल्यानंतर येथील शेतकरी आता फूलशेती, भाजीपाला व कडधान्य शेतीकडे वळत आहेत. या शेतीत कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्याने ही शेती शेतकऱ्यांना लाभदायी ठरत आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे भातशेती दरवर्षी तोट्यात जात असल्याने शेतकरी आता फूलशेती, भाजीपाला शेतीकडे वळला आहे. हे वैतरणा नदीच्या काठावर वसलेले छोटेसे खेडे गाव आहे. नदीवर गातेस व कोनसई येथे बंधारे बांधल्याने येथे बारमाही मुबलक पाणी आहे. त्यामुळे येथील शेतकरी भातशेती नंतर इतर शेती करत आहेत. या गावात रब्बी हरभऱ्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील शेतकरी फुलझाडांची लागवड करतांना दिसत आहेत. या गावात ही शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. झेंडूच्या विविध जातींच्या झाडांची लागवड केली जाते. यामध्ये जम्मू, कोलकता, अ‍ॅरोगोल्ड, मारीगोल्ड, कोलकाता व्हरायटी अशा जातींच्या झाडांचा समावेश आहे. या फुलांच्या रोपांना कळ््या लागल्यानंतर पहिल्या वेळेस त्या पोळ््यासह काढून टाकल्या जातात तर दुसऱ्या वेळी लागलेल्या कळ््या ठेवून नंतर फुले तोडली जातात. पहिल्या वेळेस कळ््या काढल्याने पुढील उत्पादन वाढते. असे येथील शेतकरी लक्ष्मण पाटील यांनी सांगितले. प्रत्येक सणावारास तसेच शुभ कार्याला अन्य फुलांप्रमाणे किंबहुणा या फुलांची मागणी जास्त असते. त्यामुळे अल्पशा खर्चात मोठे उत्पन्न देणाऱ्या झेंडूची लागवड करणे हा शेतकऱ्यांना चांगला पर्याय आहे.दादर आणि कल्याणातून मागणीयेथील हवामन आणि जमीन या फूलशेतीसाठी योग्य असल्याने या पिकाचे मोठे उत्पन्न येते. हे झाड दोन ते तीन महिन्यात फूल देते. एका एकराला ३० ते ३५ हजारांचा खर्च येतो. मात्र, दोन महिन्यांत एका एकरातून एक ते सव्वा लाखांचे उत्पन्न मिळते. आजमितीस ५० ते ६० रुपयांचा प्रति किलो भाव आहे. हा माल दादर येथील फूलबजारात व कल्याण येथे विकला जातो. व्यापारी माल घेण्यासाठी जागेवर येतात. अशी माहिती येथील शेकऱ्यांनी दिली. बाजाराच्या चढत्या-उतरत्या भावावर दर अवलंबून असतात. त्यामुळे कोणत्या हंगामात हे फूल लावले पाहिजे हे ओळखल्यास जास्त उत्पन्न मिळते. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये लागवड झाल्यास चांगला भाव मिळतो.