शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कूपनलिकेच्या पाण्यावर टोमॅटोचे विक्रमी पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 00:35 IST

मुसारणे पाड्याच्या बळीराजाची किमया

वसंत भोईर लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : सिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नसताना वाडा तालुक्यातील मुसारणे पाडा येथील शेतकऱ्यांनी स्वतः कूपनलिका खोदून तिच्या पाण्यावर टाेमॅटोचे विक्रमी पीक घेतले आहे. यंदा आतापर्यंत भावही चांगला असल्याने शेतकरी आनंदात आहेत. या वर्षी टोमॅटो शेती  लाभदायक ठरत असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मुसारणे पाडा हे एक छोटेसे खेडेगाव असून गावाच्या आजूबाजूला कोणतीही नदी अथवा मोठा तलाव अथवा कालवा नाही, मात्र येथील शेतकऱ्यांनी कूपनलिका खोदून तिच्या पाण्यावर ते विविध प्रकारची पिके घेत आहेत. भात पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई टाेमॅटाे शेतीने भरून काढण्याचा प्रयत्न येथील शेतकऱ्यांनी केला आहे.

टाेमॅटोच्या अलंकार, अभिनव या वाणाचे बियाणे आणून ते स्वतःच रोप तयार करतात व त्याची  लागवड करतात. सर्वप्रथम भात पीक काढल्यानंतर शेताची नांगरणी करून वाफे तयार केले जातात. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात त्याची लागवड केली जाते.  साधारणपणे ५० ते ६० दिवसांनी फळधारणा होते. त्यानंतर चार दिवसांनी फळे काढणीला येतात. योग्य वेळी फळतोडणी झाली तरच पुढचे फळ व्यवस्थित होते. 

एका एकराला १५०० कॅरेट टाेमॅटाे निघतात. त्याचे वजन ५० ते ५५ टन भरते. एका एकराला अंदाजे दीड लाख रुपये खर्च येतो, मात्र जसा बाजारभाव असेल त्याप्रमाणे नफा-तोटा होतो.  या वर्षी आतापर्यंत टोमॅटोला चढता-उतरता भाव असला तरी ठीक आहे, नफा होईल अशी आशा निश्चितच आहे. येथील जमीन टोमॅटोसाठी  अत्यंत उपयुक्त आहे. तसेच ठिंबक सिंचनामुळे मजूरही कमी लागतात, अशी माहिती परशुराम पाटील यांनी दिली. 

तरुणांनी आधुनिक शेतीकडे वळावे - पाटीलदैनंदिन आहारात टाेमॅटाे हा महत्त्वाचा घटक आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येथील शेतकऱ्यांनी टाेमॅटाे उत्पादनात गेल्या अनेक वर्षांपासून आपला लौकिक कायम राखला आहे. तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने  हा माल भिवंडी येथे स्वतः शेतकऱ्यांना घेऊन जावा लागतो. नाहीतर दलालांमार्फत विकावा लागतो, अशी माहिती युवा शेतकरी प्रफुल्ल पाटील यांनी दिली. तरुणांनी शेतीकडे वळून आधुनिक शेती करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार